नवी दिल्ली: सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना नोटीस जारी केली आहे. ही नोटीस आयसीआयसीआय बँकेच्या व्हिडिओकॉन ग्रुप अर्थात न्यूपावर यांच्यातील संशास्पद व्यवहारांबाबत जारी करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या बँकेने शेअर बाजाराला ही माहिती दिली. न्यूपावरमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. दरम्यान, बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योगय ते स्पष्टीकरण दिले जाईल.
दरम्यान, हे प्रकरण आयसीआयसीआय बँकेद्वारा २०१२मध्ये व्हिडिओकॉनला ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज दिल्या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. सीबीआय़ने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेसह बँक समुहाकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी कथित रूपात न्यूपावर रिन्युएबल्समध्ये ६४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली.
या कंपनीला धूत यांनी दीपक कोचर आणि दोन अन्य नातेवाईकांच्या माध्यमातून उभे केले. असाही आरोप आहे की, आयसीआयसीआयने बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर ६ महिन्यांनी धूत यांनी कपनीचे हक्क दीपक कोचर यांच्या एका ट्रस्टला ९ लाख रूपयांमध्ये ट्रन्सफर केले. दरम्यान, अशा प्रकारचा कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे बँकेने म्हटले आहे.