Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप..., चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल

Chandryan-3 Update: चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. विक्रम लँडरने आज सगळ्यात अवघड गोष्ट करुन दाखवली आहे. 

Updated: Sep 4, 2023, 11:57 AM IST
Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप..., चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल title=
Vikram Lander Exceeds Chandrayaan 3 Mission Goals With A Hop

Chandryan-3: 23 ऑगस्ट रोडी चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यापासून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत मोहिमेची माहिती देत आहे. आताही इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटलं आहे की विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले आहे. 

इस्रोचा Hop Experiment (उडी मारण्याचे प्रात्याशिक्ष) यशस्वीरित्या पार पडला आहे. विक्रम लँडरने आपले उद्दीष्ट विनाअडथळा पार केले आहे, असं इस्रोने म्हटलं आहे. इस्रोच्या माहितीनुसार, संशोधकांनी कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरचे इंजिन सुरू करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे 40 सेंटीमीटर उंचावले आणि 30 ते 40 सेमी अंतरावर सुरक्षितपणे उतरले आहे. 

विक्रम लँडर पुन्हा चंद्रावर लँड झाल्याने शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. या  Experimentचे महत्त्वही इस्रोने स्पष्ट केले आहे. भविष्यात चंद्रावर मानवी मोहिमा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्यास हा HOP Experiment महत्त्वाचा ठरणार आहे. विक्रम लँडरने गोळा केलेले नमुने पृथ्वीवर आणण्याच्या हेतून लँडरने पुन्हा अंतराळात झेपावणेही गरजेचे आहे. इस्रोच्या या HOP Experiment चंद्रावरील मानवी मोहिमेच्या आशा उंचावल्या आहेत.

विक्रम लँडिगने पुन्हा सॉफ्ट लँडिग केल्यानंतर सर्व  लँडर व्यवस्थित कार्यरत असून तैनात केलेले रॅम्प, ChaSTE आणि ILSA परत दुमडले गेले आणि प्रयोगानंतर यशस्वीरित्या पुन्हा तैनात केले गेले, अशी माहिती इस्रोने दिली आहे. 

23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे खरे काम सुरू झाले आहे. इस्रोला चंद्रावर संशोधन करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळाला होता. 14 दिवसांनंतर चंद्रावर सूर्य मावळून अंधार होणार आहे. 5 किंवा ६ सप्टेंबरला सूर्यात होऊन चंद्रावर रात्र होईल. चंद्रावर रात्र होण्याआधी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे स्लीप मोडवर जाणार आहेत. 

चंद्रावर रात्र होण्याआधी  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी पूर्णपणे चार्ज करुन सिस्टिम बंद केल्या जाणार आहेत. यानंतर रात्र झाल्यावर गरज पडेल तेव्हा यांचे सिस्टिम ऑन करता येवू शकतात. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या पृष्ठभागावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. चंद्रावर पुन्हा सूर्योदय होवून दिवस सुरु झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी सूर्य प्रकाशात चार्ज केल्या जातील. यानंतर पुन्हा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर संशोधन सुरु करतील, असं इस्रोकडून सांगण्यात येत आहे.