Dangerous Journey Of Students To School : आजकालच्या तरुण पिढीला साहसी खेळ (Adventure game) खूप आवडतात. ट्रेकिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग (Trekking, Parasailing, Paragliding, Scuba Diving) असं अनेक खेळांचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अगदी 'खितरो कें खिलाडी' (Khatro K Khiladi) या टीव्ही शोमधून आपण वेगवेगळे धोकादायक आणि भीतीदायक स्टंट (Dangerous and scary stunts) पाहिले आहेत. पूर्वीच्या काळी रस्ते असल्यामुळे अनेकांना रोज एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागतं होता. आपण आजही अशा बातम्या आणि त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत की आदिवासी गावपाड्यामध्ये आजही लोकांना जगण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. मुंबई जवळील मुरबाड,वाडा इथे एका गर्भवती महिलेला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक शाळेकरी मुलगी शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करतेय. ती मुलगी नदी ओलांडण्यासाठी नदीवरील दोरीवर जाळी (students to cross the river video) टाकते...आता या जाळीला धरून ती वेगाने लटकत नदी ओलांडते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा हृदयद्रावक व्हिडीओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. या विद्यार्थींना शिक्षणासाठी रोज असा जीवघेणा प्रवास करावा लागतो. सुरक्षिततेचे कोणतेही उपाय आणि सोय नसताना ही मुलगी असा धोकादायक मार्गाने प्रवास करते. (viral girl crossing river using zip line video on social media nmp)
We are very fortunate to live in a country where access to education is reasonably available to most.
In some parts of the world, children will risk their lives just to get to school. pic.twitter.com/oBSvsnDWjd
— Vala Afshar (@ValaAfshar) November 1, 2022
आजही शिक्षणासाठी देशातील काही भागात चिमुरड्यांना हा असा धोकादायक प्रवास करावा लागतो. हा व्हिडीओ कुठला आहे हे अजून कळलं नाही. पण हा व्हिडीओ 2 नोव्हेंबर रोजी ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लेटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. आत्तापर्यंत 3.1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.