Phone Under 7K: Nokia ने आपला फोन 7 हजारांखालील बाजारात लॉन्च केला आहे, जो चांगल्या फीचर्ससह येतो. फोनला तगडी बॅटरी देण्यात आली असून चांगला कॅमेरा मिळत आहे. Nokia 2780 Flip फोन जागतिक बाजारात लॉन्च झाल्याने त्यावर उड्या पडण्याची शक्यता आहे. हा एचएमडी ग्लोबलचा नवीन फीचर फ्लिप फोन आहे. हा डिवाइस नोकिया 2760 फ्लिप सारखाच आहे, ज्याची घोषणा यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली होती. या Nokia 2780 Flip ची किंमत जाणून घ्या.
Nokia 2780 Flip ची किंमत 80 डॉलर (भारतात अंदाजे 6,700 रुपये) आहे आणि हा फोन लाल आणि निळ्या रंगात सादर करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपासून अमेरिकेत त्याची विक्री सुरू होईल.
Nokia 2780 Flip मध्ये 2.7-इंचाचा TFT डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस 1.77-इंचाचा दुसरा डिस्प्ले आहे. तसेच वेळ, कॉलर आयडी आणि इतर टूल्स दर्शविण्यास तो सक्षम आहे. दुय्यम स्क्रीनच्या वर LED फ्लॅशसह 5MP कॅमेरा सेन्सर देखील आहे. फिचर फ्लिप फोनमध्ये क्लॅमशेल डिझाइन आणि T9 कीबोर्ड देण्यात आला आहे.
नोकिया 2780 फ्लिप क्वालकॉम 215 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 1.3GHz वर क्लॉक केलेला क्वाड-कोर CPU आणि 150Mbps च्या पीक डाउनलिंक स्पीडसह X5 LTE मॉडेम समाविष्ट आहे. स्मूथ स्टोरेजसाठी 4GB रॅम आणि 512MB आहे. डिव्हाइस 1,450mAh काढण्यायोग्य बॅटरी युनिटद्वारे सपोर्ट करीत आहे.
सॉफ्टवेअरच्याबाबतीत, नोकिया 2780 फ्लिप बॉक्सच्या बाहेर KaiOS 3.1 वर चालतो. या फोनमधून चांगले म्युझिक ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रिअल टाईम मेसेज यासारखी वैशिष्ट्ये ऑफर करण्यात आली आहे. जे कॉलवर संदेश पाठविण्यास अनुमती देते. Google मॅप, YouTube आणि एक वेब ब्राउझर देखील देण्यात आले आहे. हा फीचर फोन वायफाय, एमपी3 आणि एफएम रेडिओसह येतो.