गर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय?

आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही.

Updated: Aug 8, 2022, 10:05 PM IST
गर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय? title=

मुंबई : एखाद्या व्यक्तीचं आयुष्यातून निघून जाणं हे खूपच वाईट आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना फार दुखं होतं. परंतु असं असलं तरी एखाद्याच्या जाण्याला आपण रोखू शकत नाही. पण आपण त्याच्या सुंदर आठवणीत दिवस काढू शकतो. यासाठी काही प्रेमाचे क्षण देखील पुरेसे असतात. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं. या तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडने असं काही गिफ्ट दिलं की, ते पाहताच क्षणी बॉयफ्रेंडला आपल्या भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला.

आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही. तर हे गिफ्टचा संबंध त्याच्या कुत्र्याशी आहे.

एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाला त्याच्या कुत्र्याच्या आठवणी एका फ्रेम बद्धं करुन दिला. ज्याला पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड रडू लागला.

खरंतर या तरुणाच्या जवळच्या आणि प्रेमळ कुत्र्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होतो. ज्यामुळे हा तरुणा खूप दुखी झाला होता. परंतु त्याच्या वाढदिवसाला त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्या कुत्र्याचा 3D होलोग्राफिक दिला. जो त्याला त्याचा कुत्रा जवळ असल्याची जाणीव करुन देत राहिल.

आपल्या प्रेमळ कुत्र्याला असं सत्यात पाहून या तरुणाला आपलं रडू थांबलं नाही आणि तो खूप रडू लागला आहे. या तरुणाच्या गर्लफ्रेंडनी याप्रकरणाबद्दल सोशल मीडियावर देखील शेअर केलं, ज्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.