आईच्या ममतेपुढे भीती टिकत नाही, आज या आईने हे पुन्हा एकदा दाखवून दिले, व्हिडीओ

आईचे मुलांवरचे प्रेम सांगणारी अशीच एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jun 20, 2021, 07:12 AM IST
आईच्या ममतेपुढे भीती टिकत नाही, आज या आईने हे पुन्हा एकदा दाखवून दिले, व्हिडीओ title=

मुंबई : आईच्या ममतेसमोर कोणतीही गोष्ट मोठी नाही, अगदी भीती सुद्धा. आईचे आपल्या मुलांसाठी असलेले प्रेम सांगायची गरज नाही. ते आईच्या कृतीतूनच दिसते. आईचे मुलांवरचे प्रेम सांगणारी अशीच एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचीही परवा न करता आपल्या मुलांचे प्राण वाचवते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काळी कोंबडी आणि तिचे पल्लं एका कोपऱ्यात दाने खात असतात. तेवढ्यात तिथे एक कोब्रा साप येतो. जो त्या कोंबडीच्या पिल्लांच्या दिशेने जात असतो. हे कोंबडीने पाहाताच ती त्या सापावर उडी मारते आणि त्याला तिच्या चोचीने डिवचायला लागते. हे सगळ करत असताना साप देखील कोंबडीवर निशाना साधत तिला दंश करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला न जुमानता ती कोंबडी सापावर तुटून पडते. आपल्या जीवाचा आटापिटा करते आणि त्या सापाला पळवून लावते.

कोंबडीच्या या साहसाने तिच्या पिल्लांचा तर जिव वाचवला, त्याच बरोबर तिने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं की, आई ही आई असते. तिच्या इतकं प्रेम या जगात कोणीच कोणावर करु शकत नाही.

हा व्हिडीओ  Köksal Akın नावाच्या एका यूझरने आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करत त्यावरती कॅप्शन लिहीले,  'mother’s love'. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक लोकांनी त्यावर भरभरुन कमेंट आणि लाईक्स केले आहेत. लोकं या कोंबडीच्या कामाचे कौतुक देखील करत आहेत. काही लोकं असे देखील म्हणत आहेत की, आईच्या ममतेच्या सुरक्षा कवचा पुढे जगातील कोणतीच गोष्ट नाही आणि हे खरे देखील आहे.