मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण

Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.

राजीव कासले | Updated: Sep 17, 2024, 03:33 PM IST
मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण title=

Viral News : पोलिसांना नदीत एका तरुणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर एका कुटुंबाला मृतदेहाची ओळख पटवण्याासाठी बोलवण्यात आलं. कुटुंबियांनीही ही आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेह (Dead Body) ताब्यात घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण यादरम्यान ती मुलगी जिंवत असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता या मुलीने आपलं एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते, पण घरच्यांचा विरोध असल्याने या तरुणाबरोबर पळून गेल्याचं सांगितलं.

काय आहे नेमकी घटना?

उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) जौनपूरमधली ही धक्कादायक घटना आहे. काही महिन्यांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबियांनी मुलीवर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी त्यांची मुलगी प्रयागराजमध्ये बॉयफ्रेंडबरोबर दिसली. पोलिसांनी ही माहिती कळवल्यावर त्यांनी पुरलेल्या मुलीचा मृतदेह पुन्हा उकरून काढला आणि नव्याने तपास सुरु केलाय.

जमदहा आणि झांसेपूर गावातदरम्यान वाहणाऱ्या बेसव नदीत पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह सापडला. मृत तरुण कोण आहे याचा पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी याची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना दिली. यादरम्यान एका पोलीस स्थानकात एक तरुणी काही दिवसांपूर्वी गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तक्रार देणाऱ्या तरुणीच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासा बोलावून घेतलं. यावेळी मुस्तफाबादमध्ये राहाणाऱ्या या कुटुंबाने हा मृतदेह आपल्याच 20 वर्षीय मुलीचा असल्याचं पोलिसांना सांगितलं.

मृतदेहावर अंतिम संस्कार

पोलिसांनी पोस्टमॉर्टम करत मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. त्याच दिवशी मृतदेह स्मशानभूमीत पुरला. पण दोन दिवसांनीच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. गायब असलेली मलुगी प्रयागराजमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसह सापडली. आपल बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याचं या मुलीने सांगितलं. घरच्यांचा विरोध असल्याने पळून गेल्याची माहिती तीने पोलिसांना दिली.

पोलिसांनी सुरु केला तपास

नदीत सापडलेल्या मुलीवर कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलिसांनी मुलीने आत्महत्या केल्याचं नमुद करत प्रकरण बंद केलं. पण गायब झालेली मुलगी सापडल्याने अंतिम संस्कार केलेली मुलगी नेमकी कोण याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पोलिसांनी पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढत पुन्हा तपासाला सुरुवात केली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x