गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर

जगात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात, अशीच एक घटना भारतात समोर आली आहे. एक वृद्ध महिला गेली पंधरा वर्ष फक्त फळ्यावर लिहिला जाणारा खडू म्हणजे चॉक खाऊन जगतेय. विशेष म्हणजे तिची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळ डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 2, 2023, 11:03 PM IST
गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर title=

Viral News : मनुष्यप्रााणी खाण्याच्या बाबताती शाकाहारी (Vegetarian) आणि मांसाहारी (Non-Vegetarian) अशा दोन विभागात विभागला जातो. काहींना पालेभाज्या, भात, डाळ असे शाकाहारी पदार्थ आवडतात. तर काही जण मांस-मच्छिचे शौकिन असतात. पण या दोनही पैकी एकही गोष्ट न आवडणारी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. जगण्यासाठी माणसाला अन्न-पाणी लागतंच. पण अशी भारतात अशी एक व्यक्ती आहे, जी शाकाहारी किंवा मांसाहारी या दोन्हीपैकी नाही. तर मग ही व्यक्ती जगते तरी कशी. तेलंगणा राज्याताली राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील बदनाकाल गावातील एक वृद्ध महिला चक्क खडू (Chalk) म्हणजे फळ्यावर (Black Board) लिहिण्यासाठी वापरण्यात येणारा चॉकचे तुकडे खाऊन जगते. 

हैराण करणारं कारण समोर
एक दोन नाही तर तब्बल पंधरा वर्ष ही महिला खडूचे तुकडे खाऊन जगते. या वृद्ध महिलेचं नाव मल्लवा असं आहे. यामागे हैराण करणारं कारण समोर आलं आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी ही महिला शेतात काम करुन घरी परतत होती. सकाळीच ती जेवण तयार करुन निघाली होती, हे जेवण तीने एका प्लेटमध्ये ठेवलं होतं. पण जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचली आणि जेवणासाठी प्लेट उघडली तर तिला धक्का बसला. जेवणाला किडे लागले होते. तीने ते सर्व जेवण फेकून दिलं आणि रिकाम्या पोटीच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती आपल्या रोजच्या कामाला लागली. 

पुन्हा तीने जेवण बनवलं आणि शेतात कामासाठी निघून गेली. पण संध्याकाळी जेव्हा ती परत घरी आली तर तोच प्रकार पुन्हा घडला. जेवणात तीला किडे आढळले. दोन ते दिवस सतत होणाऱ्या या प्रकारामुळे तिचं जेवणावरचं मन उडालं. पण भूक तर लागली होती. पोटाची भूक शमवण्यासाठी तीने घरात पडलेले खडूचे तुकडे खाल्ले आणि झोपी गेली. वास्तविक खडूमध्ये कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन असतं. तेव्हा पासून तिला खडूचे तुकडे खाण्याची सवय लागली. खडूचे तुकडे आणि त्यावर विहिरीतलं स्वच्छ पाणी असं तीचं दररोजचं जेवणच झालं. 

वृद्ध महिलेची प्रकृती ठणठणीत
मल्लवा गेली पंधरा वर्ष नियमीत खडुचे तुकडे खाते आणि त्यावर विहिरीचं पाणी पिते. विशेष म्हणजे तिला कोणताही आजार नाही, तिची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. अनेकांनी आग्रह केल्याने काहीवेळा तीने सामान्य पदार्थ खाण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा तीने हे पदार्थ खाल्ले तेव्हा तेव्हा आरोग्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तीने जेवणाचा नाद कायमचा सोडला

डॉक्टरही हैराण
डॉक्टरांनी या महिलेच्या आरोग्याची तपासणी केल्यावर ते देखील हैराण झाले. मल्लवाला कोणताही आजार नव्हता. हे खुपच दुर्मिळ प्रकरण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण अल्ट्रासाऊंड पद्धतीने या महिलेच्या शरीराीच तपासणी करुन विश्लेषण करावं लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खरोखरच ही महिला केवळ खडुचे तुकडे खाऊन जीवंत आहे तर हा एक चमत्कार आहे असं डॉक्टरांचं सांगितलं.