Toilet Size Bedroom : मोठ्या शहरात भाड्याने रुम घेऊन राहाणं वाटतं तितंक सोप नाही. त्यातही मुंबई-दिल्लीपेक्षा बंगळुरुमध्ये (Bengaluru) राहाणं जरा जास्तच त्रासदायक आहे. बंगळुरुमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या (IT Company) आहेत. देश आणि जगभरातील अनेक तरुण-तरुणी नोकरीनिमित्ताने बंगळुरुमध्ये येत असतात. नोकरीसाठी बंगळुरुमध्ये आल्यावर या तरुण वर्गासमोर सर्वात मोठी समस्या असते ती भाड्याने रुम मिळवणं. याचाच फायदा तिथले एजंट आणि घरमालक घेतात. वाटेल ती किंमत सांगितली जाते. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टॉयलेट साईज रुम
बंगळुरुमध्ये अनेक इमारतीत एका रुमचे दोन रुम बनवून ते भाड्याने (Rent) दिले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पण एका व्यक्तीने पार हद्दच केली. या व्यक्तीने टॉयलेट साईज रुम बनवला आणि 1 RK भाड्याने द्यायचा असल्याची जाहीरात दिली. धक्कादायक म्हणजे या रुमसाठी त्याने अव्वाच्या सव्वा डिपॉझिट आणि भाडं ठेवलं. या रुमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या रुमचा फोटो एका रेडिट युजरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत त्याने एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे, रुम भाड्याने द्यायचा असल्याची एक जाहीरात पाहिली. यात लिहिलं होतं, बंगळुरुच्या महादेवपुरा भागात एक रुम भाड्याने द्यायचा आहे, या रुमची किंमत तब्बल 12 हजार रुपये इतकी आहे. इतकंच नाही तर त्या रुमचं डिपॉझिट 50 हजार इतकं ठेवण्यात आलंय. या रुममध्ये एक बेडही राहाणार नाही. विशेष म्हणजे या रुमची जाहीरात नो ब्रोकर टाकण्यात आली आहे. ही जाहीरात पाहिल्यानंतर युजर्सने अनेक कमेंट केल्या आहेत.
युजर्सच्या मेजशीर कमेंट
एका युजरने म्हटलंय एका बेडच्या आकाराचाही रुम नाहीए. एक युजरने म्हटलंय या रुमपेक्षा टॉयलेटही मोठं असतं. केवळ पैसे कमवण्यासाठी घरमालकाने केलेल्या या प्रकारावर लोकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत.