'त्या' परिसरात मटण डिलिव्हरी करण्यास नकार, Swiggy ने नोकरीवरुन काढलं, पुजाऱ्यांकडून सन्मान

स्विगी डिलिव्हरी बॉयने केलेल्या कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार त्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढण्यात आलेलं नाही, पण तोच आता घाबरला आहे. पण पुजाऱ्यांनी त्याचा सन्मान केला आहे. 

Updated: Mar 7, 2023, 07:57 PM IST
'त्या' परिसरात मटण डिलिव्हरी करण्यास नकार,  Swiggy ने नोकरीवरुन काढलं, पुजाऱ्यांकडून सन्मान title=

Swiggy Boy : ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) करणाऱ्या स्विगी (Swiggy) या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने केलेल्या एका कृत्याची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. त्या डिलिव्हीर बॉयने (Delivery Boy) केलेलं कृत्य योग्य की अयोग्य यावर सध्या वाद सुरु आहे. हे प्रकरण दिल्लीतलं आहे. दिल्लीतल्या (Delhi) काश्मिरी गेट भागातील प्रसिद्ध मरघट बाबा हनुमान मंदिर (Marghat Hanuman Mandir) परिसरात राहाणाऱ्या एका व्यक्तीने मटण कोरमाची (Meet) ऑनलाईन ऑर्डर (Online Order) केली. पण स्विगी डिलिव्हरी बॉयने मंदिर परिसरात मटण घेऊन जाण्यास नकार दिला. संचिन पांचाल असं या डिलिव्हरी बॉयचं नाव असून त्याने धार्मिक ठिकाण मटण घेऊन जाणार नसल्याचं सांगितलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मंदिर परिसरात मटण नेण्यास नकार
हनुमान मंदिर परिसरात राहाणाऱ्या एका व्यक्तीने मटण कोरमाची ऑर्डर केली. स्विगीचा डिलिव्हीर बॉय सचिन पांचालने हॉटेलमधून मटणाचं पार्सल घेतलं आणि तो मंदिर परिसरापर्यंत पोहोचला. पण मटण घेऊन त्याने मंदिर परिसरात प्रवेश केला नाही. त्याने ग्राहकाला फोन करुन मंदिर परिसराच्या बाहेर येऊन आपली ऑर्डर घेऊन जाण्यास सांगितलं. पण ग्राहकाने त्याला घरापर्यंत डिलिव्हरी देण्यास सांगितलं. डिलिव्हरीचं लोकेशन यमुना बाजार, हनुमान मंदिर दाखवत होतं. 

स्विगीने नोकरीवरुन काढलं?
Swiggy डिलिव्हरी बॉय सचिन पांचालने मटण कोरमाची ऑर्डर घरापर्यंत देण्यास नकार दिला. कारण ग्राहकाचं घर हे जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध मरघट हनुमान परिसरात येत होतं. वास्तविक ग्राहकाने कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर ती वस्तू घरापर्यंत पोहोचवली जाते. पण सचिन पांचालने याला नकार दिल्याने ग्राहकाने थेट स्विगी कंपनीकडे याची तक्रार केली. तक्रारीनंतर स्विगीने सचिन पांचालला नोकरीवरुन काढून टाकलं. दरम्यान, स्विगीने दिलेल्या माहितीनुसार सचिन पांचालला नोकरी टाकण्यात आलेलं नाही. पण या घटनेनंतर सचिन स्वत:च ऑर्डर घेण्यास घाबरू शकतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे असतो, पण ग्राहकांची सेवाही आमच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं स्विगीने स्पष्ट केलं आहे. 

सचिन पांचालचा ऑडिओ रेकॉर्ड व्हायरल होत आहे

सचिन पांचाल: कंपनीने अद्याप तुमची ऑर्डर रद्द केलेली नाही.

ग्राहक :  कृपया माझ्याबरोब नीट बोल

सचिन पांचाल : मी माफी मागतो, पण तुमचं दुकान मंदिर परिसरातल्या चार भिंतीच्या आत येतं, मला घरापर्यंत डिलिव्हरी करण्यास काहीच त्रास नाही, पण ते मंदिर परिसरात आहे. 

ग्राहक : तुमच्या कंपनीकडून माहिती घे, मटण ऑर्डर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, मी 365 दिवस ऑर्डर करत असतो

सचिन पांचाल : तुम्ही 365 दिवस दुकानापर्यंत ऑर्डर मागता का?

ग्राहक : हो आतापर्यंत नेहमी दुकानापर्यंत ऑर्डर आलेली आहे. माझं घर मंदिराच्या पुढे 150 मीटरवर आहे.

सचिन पांचाल : मंदिर परिसरात तुमचं दुकान खूप जूनं आहे. पण ज्या ठिकाणी तुम्ही मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद विक्री करता, त्याच दुकानात मांसाहार घेऊन मला ठिक वाटत नाही.

कस्टमर केअरशी वाद
ग्राहकाशी वाद झाल्यानंतर सचिन पांचालने कस्टर केअरबरोबर हॉटलाईनवरुन संभाषण केलं. आपण मंदिर परिसरात मटण घेऊन जाऊ शकत नसल्याचं त्याने कस्टमर केअरला कळवलं. कस्टर केअरने त्याला हे वागणं चुकीचं नाही पण ग्राहकाच्या ठिकाणापर्यंत वस्तू देण्याचा नियम असल्याचं त्याला सांगितलं. यावर सचिनने आपल्याला दुकानापर्यंत जाण्यास जबरदस्ती केली तर हा कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची धमकी दिली. 

सचिनचा केला सन्मान
सचिनने सोशल मीडियावर हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मंदिराची पवित्रता कायम ठेवण्याबद्दल मरघट हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाने सचिन पांचालचा सन्मान केला. हिंद धर्माच्या रक्षणाासाठी त्याने जे केलं ते योग्य असल्याचं मंदिर व्यवस्थापनाने म्हटलं आहे. तो व्यक्ती कोणत्याही हिंदू समाजाश किंवा राजकीय पक्षाशी बांधिल नाही, पण त्याने एक मोठा संदेश दिला आहे. आता हिंदू जागा झाला आहे, त्याला नोकरी वरुन काढून टाकलं तर मंदिर परिसरात त्याला नोकरी दिली जाईल असं मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे.