Cute Boy Viral Video : विकेंडनंतर पुन्हा आला सोमवार...अनेकांना सकाळी उठताना आणि ऑफिसची तयारी करताना प्रश्न पडला असेल ना की काय यार का जायचं आहे ऑफिसला? मंडे ब्लूजचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना येतं आहे. मस्त वीकेंडची धम्माल केल्यानंतर ऑफिसला जायचा अनेकांना कंटाळा येतो. उन्हाळ्याची सुट्टी त्यात पोरं पण घरी मग अशात कामावर जाणाऱ्या आईलाची पाय घरातून कसा निघणार...(Mother's day Viral Video)
आईविना (Mother's day video) हे जग आपण विचारच करु शकतं नाही तर आईसाठी तिचं लेकरुच अख्ख जग असतं. लेकराच्या आजूबाजूला तिचं विश्व फिरत असतं. पण आजच्या काळात या लेकराच्या उत्तम भविष्यासाठी तिला घराबाहेर कामासाठी जावं लागतं. पण रोजचा मानसिक त्रास, घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत, वर्क टेन्शन यामुळे अनेक वेळा तिला स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देता येतं नाही. (Mother's day 2023)
अशावेळी तिला कधी तरी कामावर जाण्याचा कंटाळा येऊच शकतो ना...एखादा दिवस असा असतो जेव्हा ऑफिस, तिथली कामं आणि बॉसची ओरडाओरडी अगदी रोजचा तोच तोच पणा नकोसा वाटतो. असाच काही कंटाळा कदाचित या व्हिडीओतील आईला आलेला दिसतोय.
सोशल मीडियावर एका चिमुकला आणि त्याचा आईचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा आईला ऑफिसला जायचा खूप कंटाळा आला आहे. ती लेकाजवळ आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवते आहे. आई ऑफिसला जाणार नाही हे ऐकून मुलाला आनंद झाला पाहिजे ना? पण हा चिमुकल्याने लाखात एक डायलॉग अन् आई त्याची दिवानी झाली.
खरंच आजकालची मुलं आहेत ही...जे त्यांचा निर्णयाबद्दल अगदी स्पष्टपणे सांगतात. मोहात न अडकता निर्णय घेतात. या व्हिडीओमधील चिमुकल्याही जमतेन 2 वर्षांचा आहे. पण आईला ऑफिसला जाण्यासाठी कशी प्रेरणा देतो तुम्हीच बघा ना...
आई मुलाच्या मांडीवर डोक ठेवून ''ऑफिसला नाही जायचं'' असं म्हणते. त्यावर तो चिमुकल्या म्हणतो, ''चुप हो चुप हो...ऑफिसला तर जावचं लागतं.'' हा क्यूट व्हिडीओ वारंवार पाहावसा वाटतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या yuvi_bhardwaj23 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युवी भारद्वाज हे त्या चिमुकल्याचं नाव असावं असं वाटतं.
या व्हिडीओला मजेशीर कंमेट्सचा पाऊस पडतोय. त्याशिवाय या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. हा व्हिडीओला शेअर करण्यापासून आतापर्यंत 7 million व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या रविवारी म्हणजे 14 मे 2023 ला (mother's day 2023 date) अख्खा जगात मातृदिन साजरा केला जाणार आहे.