'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ... मनहेलावून टाकणारा व्हिडिओ

सहसा लोकं उपवासाच्या दिवशी हे करतात. तर काही लोकं दररोज आपल्या ताटातील घास प्राणी-पक्षांसाठी काढतात.

Updated: Jun 17, 2021, 12:25 PM IST
'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ... मनहेलावून टाकणारा व्हिडिओ

मुंबई : हिंदू शास्त्रानुसार असे म्हटले जाते की,  जेवण्यापू्र्वी प्राण्यांना आपल्या जेवणातील काही भाग काढून ठेवायचा असतो. सहसा लोकं उपवासाच्या दिवशी हे करतात. तर काही लोकं दररोज आपल्या ताटातील घास प्राणी-पक्षांसाठी काढतात. तो घास आपण जेवून झाल्यावर किंवा जेवणापूर्वी पक्षांना किंवा प्राण्यांना देतो. परंतु तुम्ही कधी पक्षांसोबत जेवण्याचा अनुभव घेतला आहे का? कोणताही पक्षी तुमच्या ताटातले तुमच्या सोबत जेवत आहे, ही फिलिंग किती भारी आहे ना?

लोकं कुत्रा, मांजरांना किंवा गाईला आपल्या हाताने भरवत असताना तुम्ही पाहिले असणार. परंतु पक्षी सहसा माणसांच्या जवळ येत नाही. तसेच आपण पक्षांना किंवा प्राण्यांना आपल्या ताटातून अन्न काढून देतो. परंतु त्यांना आपल्या जेवणाच्या ताटात आपण जेवायला देत नाही.

पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पक्षी आणि हा व्यक्ती एकत्र जेवण करत आहेत ही गोष्ट आश्चर्य करण्यासारखी आहे. यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस जेवण्याच्या ताटावर बसून आपले जेवण करत आहे, तेव्हा तेथे एक पक्षी येतो. त्याला या व्यक्तीने तेथून हकलवून न देता, आपल्या ताटातच थोडे अन्न खायला दिले आहे आणि तो पक्षी देखील त्या व्यक्तीला न घाबरता अत्यंत प्रेमाने त्याच्या ताटातले अन्न खात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओने नक्कीच तुमच्या हृदयाला स्पर्श केला असणार. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'desalemegharaj' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच यूझर्स या व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.