फोटोत काळा चष्मा घातलेली बाई दिसतेय, एका सेकंदात गायब केला 10 लाखांचा हार... CCTV व्हायरल

चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती तर कोणाचा विश्वासही बसला नसता, वयोवृद्ध महिलेची हातचलाखी पाहून पोलीसही हैराण

Updated: Nov 30, 2022, 09:59 PM IST
फोटोत काळा चष्मा घातलेली बाई दिसतेय, एका सेकंदात गायब केला 10 लाखांचा हार... CCTV व्हायरल title=

Woman Steals Gold Necklace: चोरीच्या अनेक घटना आपण पहात असतो, वाचत असतो. हातचलाखीने आपल्या डोळ्यासमोर चोरटे दागिने (Jewellery) किंवा पैसे (Cash) लंपास करतात. अनेकवेळा यात पुरुषांबरोबरच महिलांचाही समावेश असतो. आधी चोरांना पकडून त्यांचा गुन्हा साबित करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असायचं, पण आता सीसीटीव्हीमुळे (CCTV) चोरांची हातचलाखी लगेचच पकडली जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वयोवृद्ध महिलेची हातचलाखी पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर चोरीचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमधला (Lucknow) आहे. ट्विटरवर समीर अब्बास नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिला आहे. काळा चश्मा घातलेली एक वयोवृद्ध महिला एका सोनाच्या दुकानात बसलेली या व्हिडिओत दिसत आहे. सोनाराकडून ती वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे महागडे हार बघत आहे. सोनारही तिला वेगवेगळे सेट दाखवण्यात मग्न आहे. याचाच फायदा घेत त्या महिलेने सोन्याचा हार असलेला एका सेट मोठ्या सफाईने आपल्या साडीत लपवल्याचं व्हिडिओत पाहिला मिळतंय. 

सोनाराच्या डोळ्यासमोर चोरी
सोन्याचे दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने ही महिला गोरखपूर इथल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात शिरली. दुकानात इतरही काही ग्राहक बसलेले दिसत आहेत. दुकानात एका काऊंटरसमोर बसून ती महिला सेल्समनला दागिने दाखवण्यास सांगते. काही हार बघून झाल्यानंतर सेल्समनच्या डोळ्यासमोरच त्या महिलेने सोन्याच्या हाराचा एक बॉक्स मोठ्या सफाईने साडीत लपवला. त्यानंतर हारांची डिझाईन आवडली नसल्याचं नाटक करत ती ज्वेलरच्या दुकानातून निघून गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या हाराची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे. ज्वेलर्सच्या दुकानात ती महिला निघून गेल्यानंतरही त्या महिलेवर कोणाला संशयही आला नाही. बऱ्याचवेळावे ज्वेलर्सच्या ही गोष्ट लक्षात आली पण तोपर्यंत ही महिला गायब झाली होती. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.