त्याने फोनमध्ये तरुणीचा फोटो काढला खरा, पण जेव्हा फोटो पाहिला तेव्हा... व्हिडीओ व्हायरल

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत बसली आहे आणि एक तरुण आपल्या फोनमधून त्या मुलीचा फोटो काढत आहे.

Updated: Jun 7, 2022, 11:07 AM IST
त्याने फोनमध्ये तरुणीचा फोटो काढला खरा, पण जेव्हा फोटो पाहिला तेव्हा... व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडीया हे कन्टेन्टचं आणि माहितीचं भंडार आहे. येथे तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती आणि कन्टेट मिळतील. म्हणूनच तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. येथे लोकांना वेळ कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाच समजत नाही. पण हे मात्र नक्की आहे की, येथे लोकांचं मनोरंजन होतं. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल.

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत बसली आहे आणि एक तरुण आपल्या फोनमधून त्या मुलीचा फोटो काढत आहे. हा तरुण त्या सुंदर तरुणीचा फोटो काढतो खरा, परंतु जेव्हा तो तरुणीला तिचा फोटो दाखवतो, तेव्हा मात्र तरुणीच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो.

खरंतर हा एक प्रँक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हा तरुण त्याच्या फोनमध्ये खरंतर फोटो काढत नसतो, तर त्याने आपल्या स्क्रिनवर आधीच एक फोटो लावला आहे आणि तो फोनमधली फ्लॅशलाईट चालू करुन फोटो काढला असे तरुणीला भासवतो.

त्यानंतर तो तरुणीला गाढवाचा फोटो दाखवतो, ज्यामुळे तिला खूपच राग येतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांना खूपच आवडला आहे. लोक या व्हिडीओ लाईक आणि शेअर करत आहेत.