Viral Video: ऊंटासोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महाग

काही व्हिडिओ मजेदार आणि प्रेक्षकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना सावध करणारे. सेल्फीमुळे तर खूप काही गंभीर प्रकार घडल्याचे तुम्ही पाहिले असाल. परंतू लोकं सेल्फी घेणं काही सोडत नाही.

Updated: Mar 23, 2021, 09:10 PM IST
Viral Video: ऊंटासोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महाग

मुंबई : सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडिओ मजेदार आणि प्रेक्षकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना सावध करणारे. सेल्फीमुळे तर खूप काही गंभीर प्रकार घडल्याचे तुम्ही पाहिले असाल. परंतू लोकं सेल्फी घेणं काही सोडत नाही.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. यामध्ये ही महिला प्राणी संग्रालयात एका उंटा सोबत सेल्फी घेताना दिसतेय. पण त्यानंतर त्या महिले सोबत जे घडलं ते पाहूण तुम्ही हसावे की सावध व्हावे हे तुमचं तुम्हीच ठरवा.

हा उंट या व्हिडिओमध्ये या महिलेचे चक्कं केस तोडून खाताना दिसत आहे. या उंटाला कदाचित खूप भूक लागली असावी, म्हणून त्याने त्या महिलेचे केस म्हणजे काही तरी खाण्याचा पदार्थ आहे असे समजून ते खाल्ले असावे.

पाळीव प्राणी सहसा कोणाला त्रास देताना फार कमीच पहायला मिळतात. परंतू या उंटा सोबत असे काय झाले हे फक्त तोच सांगू शकतो.

त्यामुळे पुढच्या वेळेस पाळीव प्राण्यांसोबत सेल्फी घेताना सावध रहा.