मुंबई : अनेकदा तुम्ही लोकांना रस्त्यावर किंवा अनेक ठिकाणी धोकादायक स्टंट करतानाही पाहिले असेल. लोकांना असे करुन आनंद मिळतो आणि ते किती शुर आहेत हे त्यांना दाखवायचे असते. सोशल मीडियावर देखील लोकं प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी असे काही ना काही स्टंटबाजी करत असतात. परंतु असे करताने हे लोकं आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत.
एक असाच स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल, कारण आजपर्यंत तुम्ही मुलांनाच स्टंट केल्याचे पाहिले असेल. परंतु या व्हिडीओमध्ये एक मुलगी देखील स्टंटबाजी करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि मुलगी शाळेचा गणवेश घालून धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे.
हे दोघेही ट्रेनच्यामागे लटकून हा स्टंट करत आहेत. चेन्नईच्या उपनगरात असलेल्या कावरपेट्टाई रेल्वे स्थानकावर हा व्हिडीओ काढला गेला असल्याचे दिसत आहे.
व्हिडीओमध्ये शालेय गणवेश घातलेला एक मुलगा आणि मुलगी चालत्या ट्रेनसोबत धावताना दिसत आहेत. जसजसा ट्रेनचा वेग वाढतो, तसतसे विद्यार्थी दरवाजाजवळ जोडलेले बार पकडताना आणि थ्रीलसाठी त्यांचे पाय प्लॅटफॉर्मवर खेचत असताना दिसतात.
मग जेव्हा ट्रेन स्टेशनवरून सुटते तेव्हा दोघेही ट्रेनमध्ये चढतात. व्हिडीओतील मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु कोरुक्कुपेट पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
असे थरारक स्टंट तरुणांसाठी योग्य नसतात, त्यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात होतात आणि अकाली मृत्यू होतात. मध्य प्रदेशातील 22 वर्षीय तरुण रुळावर आपल्या मित्रासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त असताना त्याला ट्रेनने धडक दिली. इटारसी-नागपूर रेल्वे मार्गावर रविवारी ही घटना घडली.
एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील मथुरा येथे फोनवर गेम खेळण्यात व्यस्त असलेल्या दोन मुलांना रेल्वेने चिरडले. आता हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स खूपच संताप व्यक्त करत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया शेअर करत आहेत.
Watch: students performing stunt on train near #Chennai at Kavarapettai Railway station #TamilNadu @grpchennai @tnpoliceoffl @GMSRailway @dt_next
source: A Whatsapp forward pic.twitter.com/qeHO6O9BCg— Raghu VP (@Raghuvp99) November 25, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. रघु व्हीपीच्या पेजवर हा व्हिडीओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हजारो लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत.
एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, "मला वाटते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजले पाहिजे की रस्ता आणि वाहन हे तुमचे खेळाचे मैदान नाही."