ही चिमुकली असं का म्हणतेय, 'भगवान जी मुझे नई मम्मी दे दो'

या व्हिडीओमध्ये चक्क चिमुकलीनं देवाकडे नवीन आई देण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे तो पाहून तुम्हाला हसूही येईल. या क्युट चिमुकलीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Updated: Mar 12, 2022, 12:54 PM IST
ही चिमुकली असं का म्हणतेय, 'भगवान जी मुझे नई मम्मी दे दो' title=

नवी दिल्ली : आपल्या आईचा कोणताही मुद्दा पटत नसेल तर लहान मुलं हट्ट धरतात. आरडाओरडा करतात किंवा ऐकत नाहीत. आई-वडील आपली मतं त्यांच्यावर लादतात किंवा मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देत नाहीत. मग अशावेळी त्यांना त्रास होतो चिडचिड होते. एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये चक्क चिमुकलीनं देवाकडे नवीन आई देण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे तो पाहून तुम्हाला हसूही येईल. या क्युट चिमुकलीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

आईला कंटाळलेला मुलीचं देवाकडे साकडं
चिमुकली पुस्तक घेऊन अभ्यास करताना दिसत आहे. आई तिच्याकडून जबरदस्तीनं अभ्यास करून घेत आहे. अभ्यासाकडे लक्ष नसल्याने ती ओरडते. आई या चिमुकलीकडून तिचा गृहपाठ पूर्ण करून घेत आहे. या चिमुकलीला अभ्यास करायचा नाही अखेर वैतागलेली चिमुकली देवाकडे अजब मागणी करते.

वैतागलेली चिमुकली देवाला म्हणजे देवा मला नवी आई दे. ही कशी आई तू जन्माला घातली असं ती म्हणजे आहे. तिला तिच्या बोलण्यातलं गांभीर्य जरी सध्या कळत नसलं तरी तिने भाबड्या मनानं देवाकडे प्रार्थना केली आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ raavya_020316 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 3.7 कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 15 हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत . एक युजर म्हणतो तू फक्त हे बाबांना सांग, तर दुसरा युजर म्हणतो, या चिमुकलीची गोष्ट ऐकून तिचे बाबा खूप खूश झाले असतील. अशा वेगवेगळ्या कमेंट्स सोशल मीडियावर युजर्सनी दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raavya (@raavya_020316)