डीजेच्या तालावर तरुणींचा 'हाणामारी डान्स'; पाहिला का Video?

या व्हिडीओमध्ये सुरु असलेली मारामारी ही मुलांच्या गटात नाही तर मुलींमध्ये सुरु आहे. 

Updated: Aug 3, 2022, 10:37 AM IST
डीजेच्या तालावर तरुणींचा 'हाणामारी डान्स'; पाहिला का Video? title=
viral video girls fight during dj road show trending video on social media in marathi

Girl Fight Video - सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही मारामारीचे अनेक व्हिडीओ (Video) पाहिले असतील. मुलांच्या फ्री स्टाइल मारामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही थक्कं होऊन जाणार. या व्हिडीओमधील मारामारी (Fight) पाहून तुम्ही आश्चर्यचिकत व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचं भांडण सोडवण्यासाठी अनेक लोक मदत करतात. पण ही मारामारी काही केल्या थांब नाही. (viral video girls fight during dj road show trending video on social media in marathi)

डीजेच्या संगीतवर मारामारी

लग्नातील वरातीत डीजेवर नाचताना तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असाल. पण या व्हिडीओमध्ये तुम्हाला वेगळंच चित्र दिसतं. या व्हिडीओमध्ये सुरु असलेली मारामारी ही मुलांच्या गटात नाही तर मुलींमध्ये सुरु आहे. होय, अगदी बरोबर रस्त्याच्या मधोमध काही मुली एकमेकांशी भिडताना दिसत आहे. गंमत म्हणजे ही हाणामारी डीजेच्या तालावर सुरु आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही मुली एकमेकांचे केस पकडून ओढत आहेत. या मुलींचे भांडण थांबवण्यासाठी रस्त्यावरील काही लोक मदत करतात. मात्र या मुली कोणालाही जुमानत नाही. 

कुठे घडली ही घटना?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील बिश्रामपूर भागातील आहे. तर या मुलींचे भांडण्याचं (Girls Fight) कारण मात्र समजू शकलं नाही आहे. काही वेळानंतर स्थानिक लोकांच्या मध्यस्थीनंतर या मुलींमधील भांड संपुष्टात आलं. 

या घटनेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी ही मारामारी कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मुलींची ही फ्री स्टाइल मारामारी पहिल्यादांज जिल्ह्यात पाहिला मिळाली त्यामुळे या जिल्ह्यात या व्हिडीओची तुफान चर्चा सुरु आहे. मात्र झी मीडिया या व्हिडीओला कुठलाही दुजोरा देत नाही.