सोशल मीडियावर का होतोय 'या' मॅगीची चर्चा? पाहा व्हायरल व्हिडीओ

या अनोख्या मॅगीला लोकांनी पसंती दर्शवली आहे.

Updated: Dec 29, 2021, 08:17 PM IST
सोशल मीडियावर का होतोय 'या' मॅगीची चर्चा? पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काहीना काही मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात काही मजेदार व्हिडीओ असतात, तर काही आपल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. सोशल मीडियावर आपल्याला सायन्स, डेकोरेशन, लाईफस्टाईलपासून ते कुकिंगपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियाचे जग हे असं जग आहे, जेथे कधी काय व्हायरल होईल हे आपल्याला सांगता येणार नाही.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा कुकिंग व्हिडीओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंच्या यादीत कुल्हड मॅगी आपल्याला पाहायला मिळत आहे. या अनोख्या मॅगीला लोकांनी पसंती दर्शवली आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळ-जवळ सगळ्याच लोकांना मॅगी खायला आवडते. मॅगी अगदी काही मिनिटांत झटपट बनते आणि ती कोणालाही सहज बनवणे शक्य आहे. म्हणूनच मॅगी सर्वांमध्ये लोकप्रिय आहे.

आपण सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले आहे, ज्यामध्ये आपल्याला मॅगीसोबत लोकं काहीतरी प्रयोग करताना दिसतात. जे पाहून मॅगी लवर्सना त्याचा खूप राग येतो. परंतु सध्या मॅगीचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो कुल्हड मॅगीचा आहे.

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना कुल्हड चहा माहित आहे. त्याचा व्हिडीओ आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहिला आहे. परंतु तंदुरी मॅगी हा लोकांसाठी नवीन प्रकार आहे. मात्र सोशल मीडियावर लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.

कुल्हाड वाल्या तंदुरी मॅगीसाठी मात्र लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि याप्रयोगामुळे मॅगीची चव आणखी वाढेल अशी लोकांची अपेक्षा आहे.

तंदूरी मॅगी कशी बनते?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, हा दुकानवारा सर्वप्रथम मॅगी नेहमीप्रमाणे बनवुन घेतो आणि त्याचा कुल्हड हा आगीच्या निखाऱ्यांमध्ये ठेवतो. हा कुल्हड जेव्हा लाल रंगाचा होतो तेव्हा हा दुकानदार त्याला बाहेर काढून एका भांड्यात ठेवतो आणि त्याच्या आत चमच्याने घासतो, ज्यामुळे त्या लाल झालेल्या कपला आग लागते. त्यानंतर काही क्षण थांबून हा दुकानदार त्या कपामध्ये मॅगी टाकतो.

कपात मॅगी टाकताच ती उकळू आण तडतडू लागते. झाली तुमची तंदुर मॅगी तयार. ही संपूर्ण क्रिया तंदुर चहासाठी देखील केली जाते.

लोकांकडून रंजक प्रतिक्रिया

अनिकेत लुथरा नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. 31 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर एक लाख लोकांनी तो लाइकही केला आहे.

या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले - 'देव मॅगीच्या आत्म्याला शांती देवो.' तर आणखी एका यूजरने लिहिले - 'मॅगी आम्हाला लाज वाटते, तुझा खुनी जिवंत आहे.' याशिवाय व्हिडीओवर लोकांच्या एकापेक्षा एक मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. जरी काही लोकांनी मॅगीसाठी अशा कमेंट्य केल्या असल्या तरी बहुतेक लोकांना ती मॅगी फार आवडली आहे.