मुंबई : सोशल मीडियावरती आपल्या नेहमीच असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात. यावरील एखादा व्हिडीओ रातोरात व्हायरल होतो. या मगील कारण आहे, या व्हिडीओमधील कंटेन्ट. एखाद्या व्हिडीओतील विषय नेटकऱ्यांच्या इतक्या जवळचा असतो की, ते अशा व्हिडीओंना वारंवार पाहातात आणि त्याला शेअर देखील करतात, ज्यामुळे असे व्हिडीओ ट्रेंड होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामधील कंटेन्ट लोकांच्या अगदी जवळचा आहे.
आपल्या सगळ्यांना तर हे माहित आहे की, बॅक बेंचर्स म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये सगळ्यात शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थी. या विद्यार्थांना अभ्यास करण्यात फारसा रस नसतो. त्यामुळे ते नेहमीच शेवट्या बाकावर जाऊन बसतात.
बऱ्याचदा अनेक बॅक बेंचर संपूर्ण वर्गाला डिस्टर्ब देखील करतात. यासाठी ते नवनवीन युक्त्या घेऊन वर्गात येतात. या सगळ्याबद्दल तुम्ही देखील शाळेत किंवा कॉलेजमध्ये अनुभवलं असेल. यासंदर्भात अनेक मीम्स देखीस सोशल मीडियावरती फिरत असतात. जे फारच मनोरंजक असतात.
अनेकदा हे सिद्ध झालंय की, बॅक बेंचर्सना अभ्यासात फारसा रस नसला तरी, त्यांच्याकडे खूप जास्त क्रिएटिव्हिटी असते, ज्यामुळे ते आयुष्यात असं काहीतरी क्रिएटिव्ह काम करुन लोकांना थक्कं करतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील असाच एक क्रिएटीव्ह बॅक बेंचर आहे. जो संपूर्ण वर्गाला डिस्टर्ब करण्यासाठी एक युक्ती लावतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा शाळेत पहिल्या बाकावरती बसला आहे. परंतु तो काहीतरी करण्याच्या तयारीत असतो. काही वेळाने तो आपल्या बॅगेतील उंदीर काढतो आणि वर्गात सोडतो. ज्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडतो.
तुम्ही जर तो उंदीर नीट पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की, हा उंदीर खोटा नाही तर खरा आहे. या मुलाने खराखुरा उंदीर आपल्या बॅगेतून घेऊन येण्याचं धाडस केलं.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती born3_memes नावाच्या अकाउंट वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर लिहिले होते की, जेव्हा बॅक बेंचर फर्स्ट बेंचवरती येतात. या व्हिडीओतील कंटेन्टमुळे तो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे. कारण आपल्यापैकी बरेच लोक आयुष्यात कधीतरी बॅक बेंचर होते.