कोरोना वॉरियर्सकडून ICU मधील रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रयत्न

देशातील कोरोना व्हायरसचे केसेस दररोज वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

Updated: May 8, 2021, 02:46 PM IST
कोरोना वॉरियर्सकडून ICU मधील रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रयत्न

मुंबई : देशातील कोरोना व्हायरसचे केसेस दररोज वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना वॉरियर्सवरील भारही लक्षणीय वाढला आहे. परंतु या कठीण परिस्थितीत देखील ते त्यांच्या सर्व वेदना विसरुन,  केवळ रुग्णांच्या आरोग्याचीच नव्हे तर त्यांच्या करमणुकीचीही पूर्ण काळजी घेत आहेत. असाच एक व्हिडीओ आजकाल इंटरनेटवर व्हायरल होत आहे, यामध्ये कोरोना वॉरियरने PPE कीट घालून रुग्णांसमोर डान्स केला आहे.

या आधी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील रूग्णालयातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासगळ्यामुळे हे सिद्ध होत आहे की, कोरोना वॉरियर्स केवळ रूग्णांना बरे करण्यासाठी परिश्रम घेत नाहीत तर, त्यांच्या करमणुकीसाठीही ते बर्‍याच गोष्टी करत असतात. बर्‍याच लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रुग्णांचे मनोरंजन आणि तणाव कमी करण्यासाठी या परिचारकाने हा सुंदर डान्स केला आहे.

हा व्हिडीओ रात्री 3 वाजताचा आहे, नर्सिंग कर्मचार्‍यांनी रूग्णांमधील भीती आणि ताण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आयसीयूमध्ये या परिचारकाने पीपीई किट घालून डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकता की, हा परिचारक पीपीई किट घालून  बेडवर असलेल्या रूग्णांसमोर डान्स करत मजा करत आहे.

एवढेच नाही तर, पलंगावरील रुग्णही त्याच्या या डान्सचा मनसोक्त आनंद घेत आहे. हा कोरोना वॉरियर्स प्रत्येक बेडजवळ जाऊन रुग्णांसमोर नाचत आहेत. मुले, वृद्ध आणि तरूण सर्व वयोगटातील रूग्ण डॉक्टरांसमवेत त्याच्या तालावर ताल धरत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ केवळ आवडतच नाही आहे, तर ते परिचारकाचे या भयानक परिस्थितीतही हसत कोरोना रुग्णांचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दलं कौतुक करत आहेत. या कोरोना वॉरियर्सच्या हा व्हिडीओ लोकं अभिमानाने मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत आणि त्याचे कौतुक करताना थांबत नाही आहेत.