बायको सारखी कटकट करते? मग पाहा असा काही उपाय तुम्ही करु शकता का?

खरेतर जगातील प्रत्येक पतीची इच्छा असते की, बायकोने त्यांच्यासोबत वाद करु नये

Updated: Jul 9, 2021, 04:31 PM IST
बायको सारखी कटकट करते? मग पाहा असा काही उपाय तुम्ही करु शकता का? title=

मुंबई : सोशल मीडियावरील व्हिडीओ नेहमीच आपले मनोरंजन करत असतात. बर्‍याच वेळा हे व्हिडीओ आश्चर्यकारक देखील असतात, कारण आपल्याला हे माहित आहे की, सोशल मीडियावर लोकं काय करतील त्याचा काही नेम नाही. काही लोकं तर असं काहीतरी करुन दाखवतात, जे खऱ्या आयुष्यात होणं सोपं किंवा शक्य नसतं. परंतु सोशल मीडियावर मात्र ते दाखवलं जातं आणि लोकं ते बघूनच समाधान मानतात.

सध्या सर्व पुरुषांना हा व्हिडीओ बघून फक्त याचा आनंद घेता येईल. यामध्ये हा नवरा एका रिमोर्टच्या मदतीने आपल्या बायकोचं तोंड बंद करत आहे.

खरेतर जगातील प्रत्येक पतीची इच्छा असते की, बायकोने त्यांच्यासोबत वाद करु नये किंवा वाद झाल्यानंतर तरी शांत व्हावे. परंतु ती काही शांत होत नाही आणि नवऱ्याला दिवस रात्र आपल्या बायकोचं बोलणं खावं लागतं. परंतु सोशल मीडियावरील या माणसाला मात्र आपल्या बायकोला शांत करने शक्य आहे, कारण त्याच्या हातात जादूचा रिमोट आहे.

ज्यामुळे त्याने आपल्या बायकोवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे. या रिमोर्टचे बटण दाबल्यावर, बायकोच्या तोंडातून आवाज येत नाही आणि बायको म्यूट मोडवर जाते. हे पाहून त्या नवऱ्याला देखील आश्चर्य वाटते. त्यानंतर तो रिवाइंड म्हणजेच मागे जाण्याचं बटण दाबतो.

त्यानंतर तो PAUSE चे बटण दाबतो. मग त्याची बायको स्तब्ध उभी रहाते. किती मस्त ना? असा रिमोर्ट तुमच्याकडे असेल तर? खरेतर सर्व पुरुषांची ही दुखती नस आहे. कारण त्यांची बायको त्यांना इतकी बडबड करत रहाते की, ती थांबतच नाही. तर कधी नवऱ्याला बोलू देत नाही.

त्यामुळे प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं की, असा काही तरी मार्ग असावा, ज्यामुळे त्यांना आपल्या बायकोचं तोंड बंद करता यावं. परंतु त्याचा काही फायदा होत नाही. कारण हे सगळं काल्पनीक आहे.

हा व्हिडीओ या व्यक्तीचे फक्त एक स्वप्न आहे, ज्याचा विचार करून तो उत्साहित होत आहे. त्याच बरोबर ही प्रत्येक नवऱ्याची इच्छा आणि लोकांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने बनवला गेला आहे.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरु शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, लोकं आता अशा रिमोटसाठी विनंती करत आहेत आणि असा रिमोर्ट ऑर्डर कुठे करायचा? किंवा ऑनलाईन तरी या रिमोर्टला उपलब्ध करुन द्यावे अशी इच्छा व्यक्त करत आहे.