मुंबई : आपल्या लागलं किंवा कोणतं संकट आलं तरी आपल्या तोंडातून पहिला शब्द निघतो तो 'आई'. आईच्या प्रेमाइतकं सुंदर आणि निस्वार्थी प्रेम या जगात दुसरं कोणतंच नाही. 'आई' हा शब्द जगातील सर्वात सुंदर शब्द आहे. आईशिवाय सर्व काही अपूर्ण आहे. आई तिच्या मुलावर खूप प्रेम करते. त्याचप्रमाणे मुलांनाही आपल्या आईबद्दल खूप ओढ असते. मग मूल लहान असो वा मोठे, त्याला त्याची आई सर्वात जास्त प्रिय असते. घरी आपल्याला आई दिसली नाही तरी आपल्याला संपूर्ण घर रिकामी वाटतं.
केवळ माणूसच आपल्या आईवरती इतकं प्रेम करतं असं नाही, तर प्राण्यांचं देखील आपल्या आईवरती प्रेम असतं आणि प्राण्यांनी हे आपल्याला वेळोवेळी दाखवून दिलं आहे.
आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला नक्कीच रडू येईल. या व्हिडीओमध्ये एका बाळाचं त्याच्या आईवर असलेलं प्रेम आणि निरागसता दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघाने माकडाची शिकार केली आहे. परंतु तरी देखील त्या माकडाचं बाळ आपल्या आईला सोडायला तयार नाही. खरेतर या वाघाने माकडाची शिकार केल्यानंतर तो माकडाला तोंडात उचलून घेऊन जात आहे. परंतु एवढं मोठं संकट समोर असतानाही हे माकडाचं बाळ निरागसपणे आपल्या आईच्या पोटाला मिठी मारुन बसलं आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लहान माकडाला फक्त त्याच्या आईला चिकटून राहायचे आहे, तो तिला सोडू इच्छित नाही. त्याच्या आईला बिबट्याने मारले पण तो त्याच्या आईच्या मृतदेहाला चिकटून राहतो.
قساوة الحياة البرية يختصرها هذا المقطع pic.twitter.com/UkyyRkhBkU
— إفتراس | prey (@iftirass) November 22, 2021
वास्तविक, जेव्हा बिबट्याने माकडाची शिकार केली होती, तेव्हा त्याचे मूलही माकडाच्या सोबत होते. बिबट्याने माकडाची शिकार केली पण त्याच्या मुलाला मारले नाही. मात्र, आईच्या मृत्यूनंतरही माकडाचे बाळ आपल्याला आईला सोडून जात नाही. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं आहे.
या माकडाच्या पिल्लाला पाहून सोशल मीडियावरही लोकं दु:ख व्यक्त करत आहेत. हा भावनीक व्हिडीओ ट्विटरवर @iftirass नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.