Viral Video : मुलं ही देवा घरची फुलं, असं आपण म्हणतो. लहान मुलांचं मन खूप निर्मळ असतं. म्हणून या चिमुरड्याचे प्रश्न किंवा त्यांची उत्तर ही फार मजेशीर असतात. सोशल मीडियावर आपण असे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहिले असाल. लहान मुलांचा निरागसपणा अनेकांचं मनं जिंकतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील मुलांचं संभाषण ऐकून आपण हसून लोटपोट होऊ.
या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलांसोबत एक व्यक्ती झाडाखाली बसला आहे. त्या दोन मुलांपैकी लहान मुलगा त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारतो. मुलांना आई कंबरेवर आणि वडील खांद्यावर घेतात. असं का असतं? यावर मोठा मुलगा म्हणतो मला यांचं उत्तर माहिती आहे मी सांगतो. यानंतर या मुलाने जे काही उत्तर दिले आहे. ते ऐकून या मुलाचा निरागसपणा तुमचं मनं जिंकून घेईल, यात शंका नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड प्रमाणात पाहिला जातोय.
एकदम असा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावरील ट्विटरच्या JustMyThoughts या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. एका यूजने तर याला 'जगातील सगळ्यात बेस्ट व्हिडीओ आहे' असं म्हटलं आहे. 30 सेकंदचा हा व्हिडीओ ट्विटरवर यूजर्सकडून जास्त जास्त वेळा बघितला जातो आहे. या व्हिडीओवर कंमेट्सचा पाऊस पडतो आहे.
एक यूजर म्हणतो, खूप जास्त इमोशनल केलं, भाई. नको करु असं. तर दुसरा यूजर म्हणतो, खूप छान मेसेज दिला आहे या मुलाने. एकाने कमेंट केली आहे की, खरंच खूप मस्त व्हिडीओ आहे हा, क्या मस्त बोला हा निरागस मुलगा. यावरुन एकच लक्षात येत आहे की, हा व्हिडीओ अनेक नेटिजन्सचं लक्ष वेधून घेत आहे. ऐका तुम्ही पण काय म्हणाला हा मुलगा...
World best video pic.twitter.com/kaaJLeGdQR
—(@Deepakv57880454) July 14, 2022