'तुमचा अहंकार...' जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल

Narayana Murthy-Kareena Viral Video: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा एक जुना व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण मूर्ती बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरवर टीका करत आहेत. विमानात प्रवास करताना एकदा करिना कपूर नारायण मूर्ती यांच्या शेजारी बसली होती. त्यावेळचा अनुभव त्यांनी शेअर केला होता.   

शिवराज यादव | Updated: Jul 27, 2023, 04:05 PM IST
'तुमचा अहंकार...' जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल title=

Narayana Murthy - Kareena Viral Video: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा एक जुना व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण मूर्ती बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरवर टीका करत आहेत. विमानात प्रवास करताना एकदा करिना कपूर नारायण मूर्ती यांच्या शेजारी बसली होती. यावेळी ती तिला भेटण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करत होती. यामुळे नारायण मूर्ती नाराज झाले होते. 

आयआयटी-कानपूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंफोसिस मूर्ती यांनी करिना कपूरबद्दल आलेला अनुभव शेअर केला होता. आपल्या चाहत्यांकडे तिने दुर्लक्ष केल्याने नारायण मूर्ती यांनी टीका केली होती. यावेळी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी मध्यस्थी करत करिना कपूरचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण यानंतरही नारायण मूर्ती यांनी आपला अनुभव शेअर करत, आपल्या नाराजीमागील कारण सांगितलं. 

नारायण मूर्ती यांनी काय सांगितलं होतं?

"मी लंडनहून येत असताना, बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर माझ्या शेजारील सीटवर बसली होती. त्यावेळी अनेक लोक येऊन तिला हॅलो म्हणत अभिवादन करत होते. पण तिने त्यावर साधं व्यक्त होण्याची तसदीही घेतली नाही," असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले "मला यामुळे थोडं आश्चर्य वाटलं. जेव्हा मला कोणी भेटण्यासाठी येत होतं, तेव्हा मी उभा राहत होतो. त्यांच्याशी एक ते दीड मिनिटं चर्चा करत होतो. किमान इतकी माफक त्यांची अपेक्षा असावी". 

यावेळी सुधा मूर्ती यांनी करिना कपूरची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तिचे करोडो चाहते असून, ती थकली असावी असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सुधा मूर्ती यांच्या या विधानानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. तर काहीजण हसू लागले होते. पुढे त्या म्हणाल्या की, "एक संस्थापक, सॉफ्टवेअर व्यक्तीचे जास्तीत जास्त 10 हजार चाहते असतील. पण चित्रपट अभिनेता, अभिनेत्रीचे करोडो चाहते असतात".

पण यानंतरही नारायण मूर्ती थांबले नाहीत. त्यांनी आपलं बोलणं सुरु ठेवत सांगितलं की, "हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की, जेव्हा कोणी तुम्हाला कोणीतरी आपुलकी दाखवतं तेव्हा तुम्हीही ती दाखवू शकता, मग ती गुप्तपणे असो. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आपला अहंकार कमी करण्याचे हे सर्व मार्ग आहेत, इतकंच". 

करिनाची बॉलिवूडमध्ये 23 वर्षं पूर्ण

गेल्या महिन्यात करिना कपूरने बॉलिवूडमध्ये 23 वर्षं पूर्ण केली. करिनाने आपल्या एका सेटवरील फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. "कॅमेऱ्यासमोर जन्म होऊ आज 23 वर्षं झाली. अजून 23 वर्षं व्हायची आहेत," असं तिने कॅप्शन दिलं होतं. करिनाने अभिषेक बच्चनसह रेफ्यूजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

करिना आता रिहा कपूरच्या 'The Crew' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करिनासह तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजित दोशांग मुख्य भूमिकेत असणार आहेत.