Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला असून यावरुन काँग्रेस (Congress) आणि भाजपामध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या व्हिडीओवरुन वाद सुरु असून हनुमानाचा (Hanuman) अपमान केल्याचा आरोप होत आहे. महिला ज्युनिअर बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील (Women Body Building) हा व्हिडीओ आहे. महिला बॉडी बिल्डर्स बिकिनीत पोझ देत असताना मागे हनुमानाचा फोटो असल्याने संताप व्यक्त होत आहे. भाजपाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाकडून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. भाजपाने याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकजे भाजपा काँग्रेसवर महिलांचा अपमान करत असल्याचा दावा करत आहे.
इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या अंतर्गत दोन दिवसांच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसने देवाचा अपमान केल्याने संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी हे ठिकाणा गंगाजलने पवित्र करुन नंतर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचं काँग्रेसने जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे भाजपा मात्र काँग्रेस महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेत्यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशन गाठत आंदोलनही केलं. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
अनेक महिला बॉडी बिल्डर्स या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी स्टेजवर संगीताच्या तालावर वेगवेगळ्या पोझ दिल्या. हे सर्व सुरु असताना शेजारीच हनुमानाचा फोटो होता. यावरच नेमका काँग्रेसने आक्षेप घेतला असून अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
रतलाम महापौर के मुख्य आतिथ्य में भगवान हनुमान जी की मूर्ति रखकर अश्लील प्रदर्शन वह भी मुख्यमंत्री जी के जन्मदिन के मौके पर।सनातन संस्कृति को बेचखाने वाले इस नेता पर क्या कार्यवाही होगी शिवराज जी? @BJP4India @OfficeOfKNath @digvijaya_28 @inc_jpagarwal pic.twitter.com/Xebc6dLKOW
— Bhupendra Gupta Agam (@BhupendraAgam) March 5, 2023
भाजपाने बजरंगबलीच्या समोर या स्पर्धेतं आयोजन करत सनातन धर्म आणि संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस नेते मयांक जाट आणि पारस सकलेचा यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या याच नेत्यांनी शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातील गाण्यात भगवी बिकिनीचा वापर केल्याने विरोध केला होता. यावरुन काँग्रेस नेत्यांनी त्यांना घेरलं असून त्यांच्या बोलण्यात आणि कर्तृत्वात फरक असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी स्पर्धेतील व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यानंत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या खाली काँग्रेस नेत्यांनी कमेंट केल्याने भाजपा नेते संताप व्यक्त करत आहेत. यानंतर भाजपा नेत्यांनी पोलीस स्टेशन गाठत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतरच भाजपा नेत्यांनी आंदोलन मागे घेतलं.