जेवणाचा फोटो काढणं महिलेला भलतंच महागात पडलं, पाहा तिच्यासोबत नक्की असं काय घडलं

काही लोकांना तर सेल्फी किंवा फोटोंचं असं काही वेड आहे की, ते त्यासाठी ना वेळ पाहात ना काळ.

Updated: May 20, 2022, 04:10 PM IST
जेवणाचा फोटो काढणं महिलेला भलतंच महागात पडलं, पाहा तिच्यासोबत नक्की असं काय घडलं title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. तर काही असे व्हिडीओ असतात, जे पाहून आपल्याला आपलं हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरु हसाला. खरंतर आपल्यापैकी प्रत्येकाला कुठेही नवीन जागेवर गेल्यावर, तसेच जेवताना फोटो किंवा सेल्फी काढण्याची सवय आहेच. 

काही लोकांना तर सेल्फी किंवा फोटोंचं असं काही वेड आहे की, ते त्यासाठी ना वेळ पाहात ना काळ, बस जिथे आणि जसा वेळ मिळेल तेथे फोटो काढण्याची सुरुवात करतात.

तसंच काहीसं या व्हिडीओमधील महिलेनं केलं, जे तिला भलतंच महागात पडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेसमोर जेवण ठेवलंलं आहे. तेव्हा ही महिला जेवणाचा फोटो काढत असते आणि फोटो काढताना ती जवळ असलेल्या स्टॅन्डवर पाय देऊन उभी राहाते आणु पुन्हा फोटो काढते. इथ पर्यंत सगळं ठिक सुरु असतं. परंतु त्यानंतर मात्र काही भलतंच घडतं.

टेबलावरील जेवण व्यवस्थीत लावण्यासाठी ही महिला खाली बसते, त्यानंतर मात्र ती फोटो काढण्यासाठी उठते, तेव्हा तिचा तोल बिघडतो आणि ही महिला खाली पडते. सोबतच ती अर्ध जेवण घेऊन खाली पडते. 

हा संपूर्ण व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे. कारण फोटोच्या नादात या महिलेला लागलं ते वेगळंच शिवाय तिचं जेवण देखील वाया गेलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर punjabi_industry__ नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच मजेदार वाटत आहे

युजर्स या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत. तुम्हाला देखील अशा प्रकारे कोणत्या ही ठिकाणी फोटो किंवा व्हिडीओ काढण्याची सवय असेल, तर जरा सांभाळून, कारण तुमच्या सोबत देखील असंच काहीसं घडू शकतं, म्हणून या व्हिडीओकडे उदाहरण म्हणून पाहा.