Welcome 2023: आता हेच पहायचं राहिल होत; Parle G बिस्कीटपासून अशी डिश बनवली की नेटकरीच भडकले

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ शॉकिंग देखील असतात. तर काही व्हिडिओ फुडचे देखील असतात.अनेक लोकांना फुडचे वीलॉग पाहायला आवडतात.

Updated: Dec 8, 2022, 10:49 PM IST
Welcome 2023: आता हेच पहायचं राहिल होत; Parle G बिस्कीटपासून अशी डिश बनवली की नेटकरीच भडकले title=

Parle G Biscuit Ka Halwa: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ शॉकिंग देखील असतात. तर काही व्हिडिओ फुडचे देखील असतात.अनेक लोकांना फुडचे वीलॉग पाहायला आवडतात. असाच एक फुडचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन नेटकरी भडकले आहेत. नेमक या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 

सोशल मीडियावर दररोज रेसीपीसचे तसेच फुड लॉगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पार्ले जीचा बिस्किट (Parle G Biscuit) हलवा बनवण्यात आला आहे. इतर अनेक घटकांचे मिश्रण करून ते तयार करण्यात आले आहे.मुळात पार्ले जीचा बिस्किटचा हलवा जरी म्हटलं तरी तोंड वाकडे होतेय. त्यामुळे चवीला हे कसे असे असा मोठा प्रश्न आहे.  

व्हिडिओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, पार्ले बिस्कीटचा हलवा (Parle G Biscuit Ka Halwa) बनवला जात आहे. कढईत तेल गरम केल्यानंतर पार्ले जी बिस्किट टाकले जात आहे आणि त्यानंतर इतर सर्व घटकांच्या मदतीने हलवा तयार करण्यात आला आहे. आता या तयार केलेल्या हलव्याची चव काय असेल, हे तो खाल्ल्यानंतरच कळेल. पण एक मात्र नक्की आहे की अनेकजण हा नवीन पदार्थ बनवण्याची पद्धत अवलंबतील.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video viral) होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतोय.हा व्हिडिओ शेअर करताना एका यूझरने लिहिले की, 2023 चे स्वागत आहे. या रेसिपीने नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक नेटकरी या रेसिपीवर भडकले आहेत.तसेच भडकल्याचा इमोजी शेअर करत आहेत.