Viral Video : घर सोडून गेलेला लेक जेव्हा पोलीस वर्दीत घरी येता तेव्हा...माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटतो

Viral Video : जेव्हा मुलगा वर्दी घालून इन्स्पेक्टर बनून घरी येतो तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू व्हायला लागतात. हा भावनिक आणि अभिमानाचा क्षणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Updated: May 28, 2023, 04:54 PM IST
Viral Video : घर सोडून गेलेला लेक जेव्हा पोलीस वर्दीत घरी येता तेव्हा...माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटतो title=
Viral Video Son came home in police uniform Mother Son Emotional Trending Video Google Trend

Viral Video : मुलाला लहानचं मोठं करायचं मग एक दिवस तो घरट्यातून भविष्य घडवायला र्भूरकन उडून जातो. जगभरात लाखो तरुण आपलं भविष्य घडविण्यासाठी घर सोडतात आणि या अनओळखी दुनियेत आपलं नशीब आजमवतात. काही तरुण आपल्या मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर आपलं ध्येय गाठतात. तर काही तरुणांना योग्य दिशाच सापडत नाही. 

मायेच्या सावलीत मोठ लहानचं मोठ करायचं आणि मग जगाच्या खड्ड्यात त्याला पडताना पाहणं पालकांसाठी कठीण असतं. पण या खड्ड्यातून तो सुखरुप बाहेर येऊन त्याचं स्वप्न पूर्ण करतो तो क्षण आई वडिलांसाठी जगातील सर्वात अनमोल क्षण असतो. ते ध्येय गाठण्यासाठी त्याने केलेली मेहनत सगळं कसं डोळ्यासमोर येतं. 

आईचा आनंद गगणात मावेना!

हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा एक आई मुलाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक तरुण पोलीस वर्दीत घरी येतो आणि हे पाहून आईच्या आनंदाला कुठेच थारा उतर नाही. 18 सेकंदांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचा डोळ्यातही पाणी आणत आहे. 

आई घर कामात व्यस्त असताना तिला दरवाजावर आवाज येतो. धानीमनी नसताना लेकाचा आवाज ऐकून माऊली दार उघडते आणि डोळ्यासमोर पोलीस वर्दीत लेकाला पाहून तिचा आनंद गगणात मावत नाही. मुलाला पाहून माऊली डोक्याला हात लावते. तिच्या डोळ्यांवर तिला विश्वास बसत नाही. त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक आईसाठी लेकाचा यश हे जगातील सर्वात मोठं सुख आणि अनमोल क्षण असतो. (Viral Video Son came home in police uniform Mother Son Emotional Trending Video Google Trend )

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील IQueenBee या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. नेटिझन्सकडून कंमेंट्सचा पाऊस पडत आहे.  आई आणि मुलांचं नात खूप खास असते. सोशल मीडियावर आई आणि मुलांचे नाते दाखविणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. पण हा व्हिडीओ प्रत्येक यूजर्सच्या काळजाला जाऊन भिडतोय. तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्कीच भावूक झाले असाल.