प्रवाशांनी भरलेल्या बसची हत्तीने फोडली काच... पुढे काय घडलं तुम्हीच पाहा व्हिडीओ

विचार करा बसमध्ये बसलेल्या या लोकांच आणि बस चालकाची स्थिती काय झाली असावी?

Updated: Sep 29, 2021, 06:22 PM IST
प्रवाशांनी भरलेल्या बसची हत्तीने फोडली काच... पुढे काय घडलं तुम्हीच पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर दिवसेंदिवस आपल्याला नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळत आहे. त्यात काही व्हिडीओ आपल्यासा आश्चर्य करतात, तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा उभा करणारा आहे. हा व्हिडीओ तामिलनाडूमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत हत्तीने बस वरती हल्ला केला आहे, ज्यामुळे बसची काच फुटली.

हा व्हिडीओ पाहून आपलाच थरकाप उडत आहे, तर विचार करा बसमध्ये बसलेल्या या लोकांच आणि बस चालकाची स्थिती काय झाली असावी? या 58 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये बसच्या समोरील काचेवर हत्तीने हल्ला करून काच फोडताना आपण पाहू शकता (Elephant attack) .

ही घटना 25 सप्टेंबर रोजी निलगिरी जिल्ह्यात घडली, जेव्हा कोटागिरीहून मेट्टुपलायमकडे जात असताना तामिळनाडू राज्य महामंडळाच्या बसवर रस्ता ओलांडत असताना जंगली हत्तीने हल्ला केला.

चिडलेल्या हत्तीचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या प्रधान सचिव असलेल्या सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हे पुढे दाखवण्यात आले आहे की बस चालक प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना बसच्या आत मागे पाठवतो. या दरम्यान, प्रवासी खूप घाबरलेले दिसले आणि घाबरून ओरडू लागले.

व्हिडीओ शेअर करताना आयएएस अधिकाऱ्याने घटनेच्या वेळी शांतता राखल्याबद्दल बस चालकाचे कौतुक केले आहे (Elephant attack).

त्यांनी व्हिडीओला कॅप्शन दिले, "निलगिरीतील या सरकारी बसच्या ड्रायव्हरचा खूप आदर आहे, ज्याने संतप्त हत्तीच्या भीषण टक्करनंतरही स्वतःला शांत ठेवले. त्याने बसमधील प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी बसच्या मागील बाजूस जाण्यासाठी सांगितले. म्हणूनच असे म्हटले जाते की, शांत मन चमत्कार करुन दाखवते."

सुदैवाने, हत्ती कोणतेही नुकसान न करता लगेच जंगलात परतला, ज्यामुळे ड्रायव्हरला त्याच्या प्रवाशांची सुटका करण्यात मदत मिळाली. तसेच बस चालकाने शांतता राखल्यामुळे पुढे होणारा मोठी घटना देखील टळली आहे.