मुंबई : हिमाचल प्रदेशसह भारतात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे लोकांची घरे उंच टेकड्यांवर आणि दऱ्यांवर वसलेली आहेत. त्यामुळे तेथे पोहचण्यासाठी डोंगरांच्यामधून छोटे रस्ते काढले जातात. मात्र, हे रस्ते खूपच धोकादायक आहेत, जिथे एका बाजूला उंच टेकडी आहे, तर दुसऱ्या बाजूला खोल दरीही आहे. आजकालच्या तरुणाईमध्ये बाइक चालवण्याची क्रेझ पाहायला मिळते, लोकं तेथे बाईक घेऊन फिरायला गेलेले तुम्ही पाहिले असेल. लोकांना बाईक घेऊन डोंगर-दऱ्यांमध्ये फिरायला आवडते, पण डोंगरावरील धोकादायक रस्ते तुम्हाला नक्कीच घाबरवतील.
केवळ दुचाकीच नाही तर ट्रक, बससह चारचाकी वाहनेही रस्त्यावरुन प्रवास करतात. या उंच डोंगरांवर हे मोठे वाहनचालकही भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसतात.
डोंगरावर दरड कोसळण्याच्या घटना आपण अनेकदा पाहिल्या आहेत. अनेकवेळा या पावसात शेकडो लोक अडकतात, त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारवर असते.
तर काही ड्रायव्हरसाठी हे रोजचे रस्ते असल्याने ते डोंगराळ मार्गांवर वाहन चालवताना बरेच अनुभवी बनतात, ज्यामुळे ते वेगाने वाहन सहजपणे चालवू शकतात. परंतु तरी देखील कधी कधी काही अनुचित घटनाही ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ट्रक ड्रायव्हर उंच डोंगरावर गाडी चालवत होता, पण नंतर त्याची गाडी एका खड्ड्यात अडकली. सुदैवाने तो तात्काळ ट्रकमधून उतरला.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातील एका खड्ड्यात अडकला होता. ज्याचा चालक खूप अस्वस्थ होता. तो शेजारी उभ्या असलेल्या लोकांना वारंवार सांगत होता की, कृपया माझी गाडी वाचवा. त्यानंतर तो ट्रक बाहेर काढण्यासाठी पुन्हा ट्रकवर चढणार होता. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी त्याला ट्रकमध्ये चढण्यास मनाई केली. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनेही त्याला सांगितले की, गाडी नवीन घेता येईल परंतु तुझे प्राण पहिले वाचव.
काही सेकंदांनंतर ट्रकच्या मागील चाक जमिनीत रुत लागला. ट्रक डोंगराच्या कडेला असल्यामुळे तेथील माती खचू लागली, ज्यामुळे ट्रकचा तोल बिघडला आणि तो ट्रक एका बाजूला झूकू लागला आणि अचानक संपूर्ण ट्रक डोंगरकड्यावरुन खाली पडला.
हा ट्रक खाली पडताना एखाद्या खेळण्यासारखा दिसत होता. Skcardetail 7 या अकाउंटवरुन हा व्हिडिओ YouTube वर शेअर केला गेला आहे, जो सुमारे 20 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाईक आणि कमेंटही केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'गरीब भावाची वर्षांची मेहनत गेली. देवाने हे कोणासोबतही करू नये.