Viral Video : सोशल मीडियावर सध्या रिल्स बनवण्याचा जोरदार ट्रेंड आहे. तरुण पिढी असो की वयोवृद्ध सोशल मीडियावर रिल्स (Reels) बनवण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. यूट्यूब (Youtube) किंवा इन्स्टाग्रामवर (Instagram) रिल्स टाकून अनेक जण मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात. यूट्यूबवर रिल्स बनवून अनेकजण चक्क लखपती झाले आहेत. त्यामुळे तरुण पिढीत झटपट पैसे कमवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसायकरण्यापेक्षा रिल्स बनवण्याकडे ट्रेंड वाढत चालला आहे. पण यासाठी काही जण वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. तर काही वेळा दुसऱ्यांचा जीवाशी खेळायलाही मागेपुढे पाहात नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रिल्ससाठी लोकांच्या जीवाशी खेळ
सोशल मीडियावर गुलजार शेख नावाच्या यूट्यूबरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हा यूट्यूबर पैसे कमावण्यासाठी लाखो लोकांच्या जीवाशी खेळताना दिसतोय. सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर अनेक युजर्सने गुलजार शेखचे व्हिडिओ शेअर केले असून भारतीय रेल्वेकडे कारवाईची मागणी केली आहे. रिल्ससाठी गुलजार शेख रेल्वे रुळावर कधी सायकल, कधी दगड तर कधी चक्क गॅस सिलेंडर ठेवतो. वेगाने येणाऱ्या रेल्वेमुळे या वस्तूंचे कसे तुकडे होतात हे गुलजार या व्हिडिओत दाखवतो. एका व्हिडिओत तो रेल्वे रुळावर कोंबडी बांधून ठेवतानाही दिसत आहे.
This is Mr Gulzar Sheikh from Lalgopalganj, UP who puts random things Infront of trains for YouTube Money, He is putting lives of 1000s of passengers in danger.
Strict action should be taken against him, @RailwayNorthern @rpfnr_ @drm_lko Sharing all the information Below pic.twitter.com/g8ZipUdbL6— Trains of India (@trainwalebhaiya) July 31, 2024
लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
@trainwalebhaiya या नावाच्या युजरने गुलजार शेखची माहिती दिली आहे. गुलजार उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथला राहाणार असून लालगोपालगंज रेल्वे स्टेशनजवळ यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करतो, ज्यामुळे अनेकवेळा रेल्वे उशीराने धावतात असं म्हटलं आहे. अनेक युजर्सने लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुलजारवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या व्हिडिओची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी गुलजार अटक करण्याची मागणीही केली आहे. . @Manish2497 नावाच्या युजरने संताप व्यक्त करत भारतीय रेल्वे त्याच्यावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.