लग्नासाठी सजलेली जणू वधूच! धबधब्याचा हा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आता जो धबाधबा आम्ही तुम्हाला सांगत आहोत तोही तितकाच सुंदर आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Updated: Oct 29, 2022, 05:13 PM IST
लग्नासाठी सजलेली जणू वधूच! धबधब्याचा हा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क title=

Viral Video: आपल्या आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणी आहेत. अगदी जगावेगळी वाटावी अशी नानातऱ्हेच्या नव्या गोष्टीही पाहायला मिळतात. कधी त्या निसर्गाच्या रूपात असतात तर कधी मानवी. निसर्ग सौंदर्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका सुंदर आणि नयनरम्य व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक सुंदर धबधबा (Waterfall) दिसत असेलच. या धबधब्याचा हा इंटरेस्टिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही असंच वाटेल की आपणही अशाच सुंदर धबधब्यात बुडावं. आणि मस्त आंघोळ करावी. जगात असे अनेक धबधबे आहेत जेथे जाण्याची अनेकांची इच्छा असते. ज्यात भारताचा दूधसागर (DoodhSagar) आणि अमेरिकेचा नायगरा (Niagara Falls) यांचाही समावेश आहे. 

आता जो धबाधबा आम्ही तुम्हाला सांगत आहोत तोही तितकाच सुंदर आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

धबधब्याचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @wowinteresting8 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 52 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 28 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या धबधब्याची एक अनोखी खासियत आहे. हा धबधबा तुम्ही पाहून नक्कीच त्याला दुल्हन का झरना असं म्हणालं. धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या माथ्यावरून पडताना त्याचा आकार एखाद्या नटलेल्या वधूप्रमाणे पहायला मिळतो. परदेशात वधू ही पांढरा गाऊन परिधान घालते, त्यामुळे हा धबधबा जणू त्या वधूसारखाच दिसतो. वरून धबधबा कोसळू लागल्यावर तो भाग डोक्यासारखा दिसतो आणि जसजसा तो खाली वाहू लागतो, तसा पाण्याचा आकार एखाद्या स्त्रीच्या शरीराप्रमाणे दिसू लागतो. हा धबधबा पेरूमध्ये आहे. ज्याला चमत्कारिक धबधबा असं म्हणता येईल. हा धबधबा तुम्हाला पाहायचा असेल तर ताबडतोब खालच्या व्हिडीओवर क्लिक करा.