दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो असं म्हणतात, पण याला तर लाथा मिळाल्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

आजच्या काळात इंटरनेट हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे आपल्याला कधी काय पाहायला मिळेल हे काही सांगू शकत नाही.

Updated: Jan 11, 2022, 08:34 PM IST
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो असं म्हणतात, पण याला तर लाथा मिळाल्या; पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : आजच्या काळात इंटरनेट हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे आपल्याला कधी काय पाहायला मिळेल हे काही सांगू शकत नाही. इंटरनेटवरील कॉन्टेन्ट कधी आपलं मनोरंजन करतात, तर कधी आपल्याला काही गोष्टी शिकवतात देखील. ज्यामुळे आपण आवडीने हे व्हिडीओ पाहतो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतो. सध्या सोशल मीडियावरती एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला व्हिडीओपेक्षा वेगळा आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि मग तुम्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही.

हा व्हिडीओ स्टेजवर डान्स करणाऱ्या दोन मुलींशी संबंधित आहे, जे आपला परफॉर्म देत असतात, पण तेव्हाच त्या दोघींमध्ये असं काही तरी घडतं, ज्याचा कुणी विचारही करु शकत नाही. हा व्हिडीओ काही वेळातच हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि लोकांना तो खूप आवडला आहे.

मुली अचानक भांडतात

व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये स्टेजवर मुली डान्स करताना दिसत आहेत. डान्स पाहण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने आले आहेत. सुरुवातीला सर्व काही ठीक दिसते पण पुढच्याच क्षणी दोन्ही नाचणाऱ्या मुली एकमेकांशी भांडू लागतात आणि त्या साध्यासुध्या भांडत नाही तर एकमेकींचे केस, कपडे खेचून मारतात.

त्यामुली तेवढ्यावरच थांबत नाहीत, तर जेव्हा त्यांना भांडताना पाहून एक व्यक्तीमध्ये येते आणि त्यांना थांबण्याचा प्रयत्न करते तेव्हा या दोघीही मिळून त्या व्यक्तीची देखील पिटाई करतात. या दोघी मिळून त्या व्यक्तीला पायाने खूप मारतात. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सही भरपूर कमेंट देखील करत आहेत. इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या पेजवर हा व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे