कतरिनाला कॉपी करणारी ही 'चिकनी चमेली' कोण?

ही तरुणी वेगवेगळ्या गाण्यांच्या डान्स स्टेप्स न पाहता हुबेहुब कॉपी करते.

Updated: Dec 18, 2021, 04:51 PM IST
कतरिनाला कॉपी करणारी ही 'चिकनी चमेली' कोण? title=

मुंबई : भारतात जुगाड आणि कौशल्याची काही कमी नाही याची प्रत्येकवेळी प्रचिती सोशल मीडियावरून येत असते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण आपलं कौशल्य सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून दाखवत असतात. एक तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही तरुणी वेगवेगळ्या गाण्यांच्या डान्स स्टेप्स न पाहता हुबेहुब कॉपी करते.

हा व्हायरल व्हिडिओ दिल्लीतील एका मुलीचा आहे. या तरुणीनं कतरिनाच्या 'चिकनी चमेली' गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की टीव्ही मागे सुरू आहे. त्यावर जशा डान्स स्टेप सुरू आहेत तशाच हुबेहुब ती करत आहे. विशेष म्हणजे टीव्ही न पाहता तरुणी डान्स स्टेप खूप छान करत आहे. 

'चिकनी चमेली' हे एक आयटम साँग 2012 मध्ये रिलीज झालेल्या अग्निपथ सिनेमातील आहे. कतरिना कैफने या गाण्यावर बँग डान्स केला आणि अनेक मुली त्याच धमाकेदार डान्सची कॉपी करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे.

Manisha Sati असं या तरुणीचं नाव आहे. ती इन्स्टाग्राम आणि जोशवर वेगवेगळे व्हिडीओ टाकत असते. 485k तिचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांना वेड लावलं आहे. तिने हाय चका चक हू मैवर देखील डान्स केला आहे.