व्हिडिओ : खाली कोसळलेल्या महिलेच्या अंगावरून रेल्वे निघून गेली पण...

आजूबाजूला उपस्थितांची गर्दी होती. परंतु, कुणालाही या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही करता आला नाही

Updated: Aug 24, 2019, 10:15 AM IST
व्हिडिओ : खाली कोसळलेल्या महिलेच्या अंगावरून रेल्वे निघून गेली पण...  title=

नवी दिल्ली : रांची रेल्वे स्टेशनवर एक अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. हे दृश्यं पाहून उपस्थितांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास उरला नाही. रांची रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ हून रांची लोहरदगा एक्सप्रेस जात होती. याच दरम्यान रेल्वेतून प्रवार करणारी एक महिला खाली कोसळली. व्हिडिओतून ही महिला वयस्कर असल्याचं लक्षात येतंय. खाली कोसळलेली ही महिला प्लॅटफॉर्महून खाली घसरून थेट रेल्वेच्या खालीच जाऊन पडली. हे दृश्यं पाहताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकलाच.

परंतु, सुदैवानं रेल्वे ट्रॅकच्या बाजुला पडलेली ही महिला तिथंच अडकली. आजूबाजूला उपस्थितांची गर्दी होती. परंतु, कुणालाही या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही करता आला नाही. या दरम्यान संपूर्ण रेल्वे पुढे मार्गस्थ होईपर्यंत ती महिला रेल्वेखालीच पडून होती.

रेल्वे पुढे गेल्यानंतर ही महिला उभी राहिली आणि पुन्ही ती प्लॅटफॉर्मवर चढली... तेव्हा उपस्थितांनीही मोकळा श्वास घेतला.