भारतातील पहिला 'पोलीस रोबोट'; रेकॉर्डिंगद्वारे होणार तक्रार दाखल

भारतातील पहिला 'CYBIRA' (Cyber Security Interactive Robotic Agent) रोबोट लॉन्च

Updated: Nov 20, 2019, 09:35 AM IST
भारतातील पहिला 'पोलीस रोबोट'; रेकॉर्डिंगद्वारे होणार तक्रार दाखल title=

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम पोलिसांनी भारतातील पहिला 'CYBIRA' (Cyber Security Interactive Robotic Agent) हा रोबोट लॉन्च केला आहे. हा रोबोट आवाजाद्वारे किंवा स्वत: तक्रारदारांच्या तक्रारींची नोंद करुन घेईल. स्टार्ट अप कंपनी 'रोबो कपलर प्रायव्हेट लिमिटेड'ने (Robo Coupler Private Limited)'CYBIRA' रोबोट लॉन्च केला.  पोलीस स्टेशनमध्ये प्रभावीपणे तक्रारी नोंदवणं आणि तक्रारींचं निराकरण करणं यासाठी या रोबोला डिझाइन करण्यात आलं आहे.

हा रोबोट सध्या महारानीपेटा पोलीस स्टेशनमध्ये आहे. हा रोबोट व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे किंवा त्याला जोडलेल्या लॅपटॉपवर लेखी नोंद करू शकतो.

रोबोटद्वारे तक्रारदाराकडून जर तक्रारीचं निराकरण झालं नाही तर, उच्च अधिकाऱ्यांना सिस्टममधून आपोआप पुढील २४ तासांत मेसेज पाठवण्यात येतो. या रोबोटमध्ये एकून १३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. म्हणजेच आसपासच्या भागांत २४ तास या रोबोटचं ३६० डिग्री लक्ष असणार आहे. एखाद्या पोलिसाकडून जुना कोणताही गुन्हेगार ओळखण्यात आल्यास, रोबोट याबाबतची माहिती कंट्रोल रुमला देणार आहे.

सोमवारी पोलीस आयुक्त आर. के मीना यांनी रोबोटिक सुविधा लॉन्च केलीय. यावेळी पोलीस आयुक्त आर.के मीना यांच्यासह डीसीपी एस. रंगा रेड्डी, स्टार्ट-अप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण मल्ला उपस्थित होते.

तक्रार नोंदविल्यानंतर रोबोटकडून संबंधित तक्रारदार आणि तपास अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत प्रश्न सोडवण्यास सूचित करण्यात येईल. प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जास्तीत जास्त तीन दिवसांची मुदत असल्याचं प्रवीण मल्ला यांनी सांगितलं.