नवविवाहित पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपांमध्ये लोकप्रिय इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राच्या संकटात वाढ झाली आहे. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी रविवार 24 डिसेंबर रोजी नोएडा पोलिस बिंद्राच्या सेक्टर 94 स्थित सोसायटीमध्ये पोलीस पोहोचले. पोलिसांनी ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणची चौकशी करणार आहे. कारण मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, बिंद्राची पत्नी यानिकाचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे. यावर आता चौकशी होणार आहे. त्यांनी सांगितलं की, सोसायटीमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी जवळपास 17 दिवसांपूर्वीचे CCTV फुटेज पाहिले. पोलिसांनी तपास केला तेव्हा विवेक बिंद्रा उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वी यानिकाच्या भावाने सेक्टर 126 मध्ये गुन्हा दाखल केला आहे. 7 डिसेंबर रोजी जवळपास 3 वाजता विवेक बिंद्रा आपल्या आई प्रभासोबत वाद करत होता. या दरम्यान त्याची पत्नी मध्ये आली. तेव्हा विवेकने पत्नीला एका खोलीत बंद केलं आणि शिव्या दिल्या एवढंच नव्हे तर बेदम मारहाण केली.
विवेक बिंद्राने केलेल्या मारहाणीमुळे खूप दुखापत झाली आहे. 14 डिसेंबर रोजी विवेक बिंद्राच्या विरोधात FIR दाखल झाली आहे. आता पत्नीची स्थिती उत्तम असून उपचार सुरु आहे. विवेक बिंद्राचा पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिंद्रा बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड (BBPL) चे सीईओ आहेत आणि त्यांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.
एका घोटाळ्यावरून दोन युट्युबर्समधील वाद सुरू झाला. 11 डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी 'मोठा घोटाळा' उघड केल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये ते शिकवण्याच्या व्यवसायाच्या नावाखाली लोक हजारो रुपयांचे कोर्सेस विकत असल्याबद्दल बोलत होते. त्यांनी याला मोठा घोटाळा म्हटले आहे. व्हिडिओमध्ये तो दोन मुलांशी बोलत आहे. एक मुलगा सांगतो की, त्याने एका मोठ्या यूट्यूबरकडून 50 हजार रुपयांना कोर्स विकत घेतला, तर दुसरा म्हणतो की, त्या बदल्यात त्याने 35 हजार रुपये दिले. मुलांनी सांगितले की, त्यांना हा कोर्स इतर लोकांना विकण्यास सांगितले जाते, हे एक प्रकारचे मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे. यानंतर संदीप माहेश्वरी यांनी हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचे सांगत हा प्रकार थांबवावा, असे सांगितले. मात्र, या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणत्याही बिझनेस गुरूचे नाव घेतले नाही.