मुंबई : टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडीयाच्या शेअरमध्ये (आज) 5 ऑगस्ट मोठी घसरण झाली. IDEA चा शेअर 6 रुपयांच्याही खाली आला आहे. कंपनीने बुधवारी माहिती दिली की, कुमार मंगलम बिर्ला यांनी नॉन एक्झेक्युटीव्ह डायरेक्टर आणि नॉन एक्झेक्युटीव्ह चेअरमन पद सोडले आहे. हा निर्णय 4 ऑगस्टपासून लागू करण्यात आला. त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सेंटीमेंट बिघडले आहेत. कंपनीच्या भविष्याबाबत गुंतवणूकदारांमध्ये शंका निर्माण होत आहेत. आता प्रश्न हा उरतो की, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठे नुकसान सहन केल्यानंतर गुंतवणूकदारांनी आता करायचे काय? अद्यापही पॉझिटिव्ह टिगरसाठी धीर धरायचा की, बाहेर पडायचे? याबाबत महत्वाचा सल्ला झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांनी दिला आहे.
सेंटीमेंट
अनिल सिंघवी यांचे म्हणणे आहे की, वोडाफोन आयडीयामध्ये जे घटनाक्रम होत आहेत. त्यामुळे शेअर होल्डर्सची चिंता वाढली आहे. अशातच संकेत मिळत आहे की, कंपनी टेलिकॉम बिझनेसमध्ये पैसा गुंतवू इच्छित नाही. मग एवढ्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरचे काय होणार? कंपनी पुढे चालेल की नाही. यासारखे प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत.
गुंतवणूकदारांनी काय करावं?
कंपनीच्या भविष्याबाबत अनिल सिंघवी यांनी म्हटलं आहे की, सध्या त्यावर भाष्य़ करणं कठीण आहे. परंतु येत्या काळात कंपनीच्या व्यवस्थापनाचा काय प्लॅन आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांना रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने निर्णय घ्यावा लागेल. जर हाय रिस्क घेण्याची क्षमता असेल तर स्टॉकमध्ये टिकून रहा. एखाद्या पॉझिटिव्ह ट्रिगरसाठी वाट पहा.
शेअर पुन्हा 10 ते 12 रुपयांवर आला तर तेथून ज्यांना रिस्क घेण्याची इच्छा नाही. त्यांनी बाहेर पडावं. जेणेकरून नुकसान कमी होईल.