मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई; १० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक

पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे १० नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे.   

Updated: Nov 3, 2020, 12:08 PM IST
मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई; १० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक title=

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मध्य प्रदेशकडे लागले आहेत. त्याला कारण आहे, ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होत असलेली २८ जागांकरता पोटनिवडणूक. ज्यामुळे साध्य होणार आहे की राज्याची राजकीय नाडी नक्की कोणाच्या हाती आहे. शिवाय १० राज्यांतील विधानसभेच्या ५४ जागांसाठी आज मतदान होत आहे. ज्यामध्ये मध्यप्रदेशमध्ये २८, गुजरातमध्ये ८ तर उत्तर प्रदेशमध्ये ७ अशा ४३ जागांवर पुन्हा मतदान होत आहे. तर या पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे १० नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे. 

मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या मतदानाच्या आकड्यांवर भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निर्भर आहे. भाजपला या निवडणुकीमध्ये फक्त ९ जागांवर विजय मिळवायचा आहे. तर काँग्रेसला मात्र २८ जागांवर आपला झेंडा फडकवायचा आहे. कारण ११५ या जादूच्या आकड्यावर या २८ जागा काँग्रेसला पोहचवू शकतात. 

सद्य स्थिती पाहता भाजपकडे १०७ जागा आहेत, तर काँग्रेसकडे ८७ जागा आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई होत असताना दिसत आहे. मध्य प्रदेश व गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा निवडणूक घेतली जात आहे.

२०१८मधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तेव्हा काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार देखील स्थापन केले.  परंतु ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या २२ समर्थक आमदारांसह कॉंग्रेससोबत बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला.