Warren Buffet यांचा इंडिकेटर भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत देतोय खतरनाक संकेत; वाचा कारण

भारताच्या जीडीपी ग्रोथमध्ये रिकवरी ची नोंद होत आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे.

Updated: Aug 27, 2021, 11:15 AM IST
Warren Buffet यांचा इंडिकेटर भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत देतोय खतरनाक संकेत; वाचा कारण title=

नवी दिल्ली  : भारताच्या जीडीपी ग्रोथमध्ये रिकवरी ची नोंद होत आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे. जीडीपी रिकवरीची गती आणि शेअर मार्केटच्या तेजीची गती जुळत नाहीये. कंपन्यांच्या कमाईचे निकाल, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आलेली तेजी खतरनाक संकेतांकडे इशारा करीत आहे.

भारतीय शेअर बाजारातील काही तज्ज्ञांचे मत आहे की, भारताचा जीडीपी ग्रोथची रिकिवरी शेअर बाजाराच्या तेजीच्या प्रमाणात कमी आहे. एवढेच नाही तर, कंपन्यांच्या तिमाही निकालांपेक्षा बाजाराची तेजी अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थव्यवस्थेची स्थिती
भारतीय शेअर्सचे मुल्यांकन आणि मार्केट कॅपिटलायजेशन भारताच्या ग्रॉस डोमॅस्टिक प्रोडक्टच्या प्रमाणात मॅच होत नाहीये. ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत बाजार अतिशय गतीने वाढला आहे. जगातील दिग्गज शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या इंडिकेटरच्या हिशोबाने भारतीय जीडीपी ग्रोथ आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा रेशो कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी स्थिती दर्शवतो.