लहानमुलांप्रमाणे माकडालाही मोबाईलचा मोह आवरेना...तुम्हीच सांगा मोबाईल कोणाकडे हवा?

ही तरी कशी बरं देईल मोबाईल त्याला? आजकालची लहान मुलं ज्यांना मोबाईलमधून बाहेर डोकं काढायला जराही वेळ नसतो.

Updated: Jul 8, 2021, 04:57 PM IST
लहानमुलांप्रमाणे माकडालाही मोबाईलचा मोह आवरेना...तुम्हीच सांगा मोबाईल कोणाकडे हवा?

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु इतका गोड व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसावा. या व्हिडीओमध्ये माकड आणि छोट्या मुलीचे गोड भांडण टिपले आहे. प्राण्यांना माणसांप्रमाणे वागायला आवडते, त्यात माकड म्हटलं तर त्यांना तर माणसांची नकल करायची भलतीच आवड. पण म्हणून काय त्याने मोबाईल घ्यायचा? तो पण या चिमुकलीच्या हातातला? नाही... अजीबात नाही.

ही तरी कशी बरं देईल मोबाईल त्याला? आजकालची लहान मुलं ज्यांना मोबाईलमधून बाहेर डोकं काढायला जराही वेळ नसतो. त्यात त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याची आई वडिल देखील हिंमत करत नाहीत. कारण तो जर मोबाईल काढून घेतला, तर घरात जो धिंगाणा होईल त्याला कोणीच थांबवू शकत नाही.

पण असे असतानाही या माकडाने काय हिंमत केली पाहा. आधिच माकडाला नकल करण्याची हौस, त्यात त्याला या मोबाईलचा मोह. मग काय तो ही गेला या मुलीकडे आणि घेतला मोबाईल काढून.

मोबाईल घेताच त्यात इतकं काय खास आहे? हे माकड पाहू लागला. पण इतका वेळ या चिमुकलीकडे नाही. तिचाच फोन आणि माकडाने तो ही हिस्काऊन घेतला हे कसं चालेल बरे?

मग हिने देखील आपला फोन या माकडाकडून खेचून घेतला. पण माकडाला देखील आता हा फोन द्यायचा नाही... नाही म्हणजे नाहीच... मग त्याने एक सेकंदही वेळ वाया न घालवता पुन्हा या चिमुकलीच्या हातातुन मोबाईल खेचून घेतला आणि आपल्याकडे इतका घट्ट पकडून ठेवला की, पुन्हा त्याच्या हातातून तो कोणीच काढून घेऊ शकणार नाही.

या 15 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तरी आपल्याला एवढेच पाहायला मिळाले आहे, त्यानंतर मात्र या चिमुकलीने काय केलं असावं ते तिलाच माहित. परंतु हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याला इतक्या लोकांनी पाहिला आणि इतक्या लोकांनी शेअर केला की, बस रे बस...

लोकांना या दोघांमधील मोबाईल मिळवण्यासाठीची ही धडपड आणि हे भांडण खूपच आवडलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.