मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत असलेल्या ओडिसाच्या (Odisha Similipal Forest) जंगलावर महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची कृपा वर्षाव झाला आहे. होरपळलेल्या या निसर्गावर शंकराने कृपादृष्टी दाखवत पाऊस पाडला आहे. याचा फॉरेस्ट गार्ड महिलेने आपला आनंद चक्क डान्स करून व्यक्त केली. या आनंदाचा (Watch Woman Forest Guard Dancing To The Tune Of Rain In Similipal) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
जंगलात फॉरेस्ट महिला गार्ड (Park Woman Forest Guard Dances) डान्स करताना दिसून आली आहे. आग लागलेल्या जंगलात पाऊस आल्यानं ही महिला पोलीस प्रचंड खूश झाली आणि आनंदाच्या भरात तिने नाचायला सुरूवात केली आहे.
पाऊस येण्याच्या आनंदात ही महिला खुश होऊन ओरडत आहे आणि डान्सही करत आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला एकटीच डान्स करत आहे आणि देवानं आपलं म्हणणं ऐकल्यामुळे धन्यवाद सुद्धा म्हणत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर भारतीय फॉरेस्ट ऑफिसर रमेश पांडे यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, याप्रकारे पाऊस देवाची मदत करत आहे. ओडीसाच्या सिमलीपालच्या अग्निशमन दलातील महिला वनपाल यांचा आनंद तुम्ही पाहू शकता.
Such rains are like helping hands of God. One can see the happiness of lady forester involved in firefighting in Similipal, Odisha. Good news is that fire is under control as per the current MODIS satellite data.
Via @ykmohanta pic.twitter.com/6RVagrCxQz— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) March 10, 2021
आशियाचं दुसरं सगळ्यात मोठं ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल नॅशनल पार्क सध्या आगीत जळत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळाल्या. राज्य सरकारनं बुधवारी दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि पाण्याच्या फवाऱ्याच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
हा पार्क म्हणजे मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा भाग आहे. याच बरोबर टायगर रिझर्व्हदेखील आहे. एवढेच नाही, तर हा पार्क जोरांदा आणि बेरीपानी फॉल्स सारख्या सुंदर सरोवरांसाठीही प्रसिद्ध आहे. यूनेस्कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे.