रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर भर देणार - रेल्वेमंत्री

 रेल्वेची कोणतीही दरवाढ होणार नाही, असं सांगत रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना दिलासा दिलाय. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. 

Updated: Sep 28, 2017, 03:44 PM IST
रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर भर देणार - रेल्वेमंत्री title=

नवी दिल्ली : रेल्वेची कोणतीही दरवाढ होणार नाही, असं सांगत रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना दिलासा दिलाय. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी गोयल यांनी रेल्वे संदर्भातील विविध नवनवीन घोषणा केल्या. आगामी काळात सुरक्षित प्रवासावर भर देणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितलंय. यासाठी जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. 

मुंबईकरांसाठी 100 नव्या लोकलच्या फे-या सुरु केल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिलीय. इस्रोशी चर्चा करुन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणार असल्याचंही गोयल यांनी म्हटलंय. याशिवाय जीपीएसद्वारे रेल्वे मॉनिटरिंग, रेल्वेत 100 टक्के एलईडीचा वापर अशा घोषणाही त्यांनी केल्या. पारदर्शकता आणण्यासाठी सर्व टीसी, आरसीएफ स्टार्फ युनिफॉर्ममध्येच काम करणार असल्याचंही गोयल यांनी सांगितलंय.