आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर...

Updated: Jun 29, 2020, 02:59 PM IST
आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली title=
फोटो सौजन्य : ANI

गुवाहाटी : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. आसाममध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून पूरामुळे लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. राज्यात पुरामुळे 23 जिल्ह्यातील जवळपास 10 लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राज्यातील धेमाजी, तिनसुकिया, माजुली आणि डिब्रूगढ हे जिल्ह्ये सर्वाधित प्रभावित झाले आहेत.अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी वीज पडून एका दिवसांत 83 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आता बिहारमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय मुसळधार पावसासह येथे वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

रविवारी बिहारमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागानुसार, बिहारमध्ये आतापर्यंत 92 टक्के पाऊस झाल्याचं सांगण्यात आलं आहे. जूनमध्ये दरवर्षी 144 मिमी पाऊस होतो परंतु यंदा तो 276 मिमी झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे बिहारमधील अनेक नद्या भरल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.