Padma Awards 2024: भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात केली आहे. यंदा 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यातील 12 मान्यवर महाराष्ट्रात आहे. पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना कोणत्या सुविधा मिळतात? हे जाणून घेऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम, अभिनेते चिरंजीवी, बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले
कला क्षेत्र, साहित्य, क्रिडा, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांसाठी निवडण्यात येते. पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून काय मिळते, हे तुम्हाला माहितीये. आज आपण याबाबत माहिती जाणून घेऊया.
पद्मविभूषण हा पुरस्कार अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.
पद्मभूषण पुरस्कार उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो
पद्मश्री हा पुरस्कार विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. गृह मंत्रालयानुसार, भारतातील सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. मात्र, सरकारी कर्मचारी या पदावर असेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. फक्त डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना यातून वगळण्यात येते.
राष्ट्रपती भवनात या सोहळ्याचे आयोजन केले जाते. राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते. पद्म पुरस्कार मिळणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेले प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना त्यांच्या मेडलची प्रतिकृतीदेखील दिली जाते.
मान्यवरांना पद्म पुरस्काराची प्रतिकृती दिली जाते. ती प्रतिकृती ते कोणत्याही कार्यक्रमात परिधान करु शकतात. तसंच, समारंभाच्या दिवशी पुरस्कार विजेत्यांची नावे भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केली जातात. मात्र, पुरस्कारप्राप्त विजेत्यांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. तसंच, रेल्वे प्रवाल किंवा हवाई प्रवासाच्या सुविधाही दिल्या जात नाहीत.
देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केला जातो. भारतरत्नासाठी नावांची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला देशात व्हिआयपी दर्जा मिळतो. त्या व्यक्तीची गणना देशातील सर्वोच्च पदांवर असलेल्या लोकांसोबत केली जाते. भारतरत्न मान्यवरांना हवाई, ट्रेन आणि बसचा प्रवास मोफत मिळतो. राज्य पाहुण्यांचा दर्जा मिळतो. भारतरत्न मिळणाऱ्यांना राज्य सरकार सुविधा पुरवतात.