Cancer Insurance Policy: कर्करोग हा आजार आहे की, याबाबत नुसतं ऐकलं तरी पायाखालची जमिन सरकून जाते. दुसरीकडे कर्करोग बरा करण्यासाठी लागणारा पैसा म्हणजे न सांगितलेलंच बरं. कर्करोगाचा कुटुंबावर शारीरिक, भावनिक आणि आर्थिक प्रभाव पडतो. त्यामुळे हल्ली Cancer Insurance Policy ची चर्चा होत आहे. एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान होताच कँसर इन्शुरन्स पॉलिसी सक्रिय होते. विमा कंपनी विम्याच्या रकमेइतकी एकरकमी रक्कम देते. या रकमेचा उपयोग कर्करोगाच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी केला जाऊ शकतो. साधारणपणे हा दावा कर्करोगाच्या लहान, मोठ्या आणि गंभीर टप्प्यावर उपलब्ध असतो. पॉलिसी वर्षात कॅन्सरचे निदान झाल्यास ही रक्कम मिळते. कर्करोग विमा मृत्यू लाभ, परिपक्वता लाभ आणि सरेंडर लाभ देत नाही. कॅन्सरच्या उपचारांच्या जास्त खर्चामुळे कॅन्सर इन्शुरन्स पॉलिसी घेणे आवश्यक आहे. आदित्य बिर्ला, बजाज अलियान्झ, भारती AXA, रिलायन्स आणि SBI सारख्या कंपन्या भारतात कर्करोग विमा योजना ऑफर करतात.
कँसर इन्शुरन्स प्लान कर्करोगाचे काही टप्पे कव्हर करते. पॉलिसीधारकाला कर्करोगाचे निदान झाल्यावर एकरकमी रक्कम दिली जाते. प्रीमियममध्ये सूट देण्याचा फायदा काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण वर्षभर कोणताही दावा न केल्यास, विम्याची रक्कम पूर्वनिर्दिष्ट टक्केवारीने वाढते. अनेक योजनांतर्गत कर्करोगाचे विमा संरक्षण रोगाचे प्रथम निदान झाल्यानंतर संपत नाही. यासह, आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत भरलेल्या प्रीमियमवर कर लाभ देखील उपलब्ध आहे.
बातमी वाचा- Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
तुमच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास, तुम्ही कर्करोगाचा विमा घ्यावा. यासह, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पर्यावरणीय किंवा इतर कारणांमुळे कर्करोग होण्याचा धोका आहे किंवा तुमच्याकडे वैद्यकीय बिले भरण्यासाठी बचत नसेल तर तुम्ही ही पॉलिसी खरेदी करावी. कर्करोग विमा योजना फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, हायपोलॅरिन्क्स कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कव्हर करतात.
बातमी वाचा- Salary Overdraft: सॅलरी अकाउंटवरही मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा, गरजेच्या वेळी होते मदत
त्वचा कर्करोग, लैंगिक संक्रमित रोग, एचआयव्ही आणि एड्स या पॉलिसी अंतर्गत येत नाहीत. तसेच, कोणत्याही जन्मजात स्थितीमुळे आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या स्थितीमुळे होणारा कर्करोग, जैविक, आण्विक किंवा रासायनिक दूषिततेमुळे होणारा कर्करोग आणि कोणत्याही किरणोत्सर्गी किंवा किरणोत्सर्गामुळे होणारा कर्करोग याचा समावेश करत नाही.