फ्लशमध्ये एक लहान आणि एक मोठं बटन, यामागचं कारण माहितीय

वॉशरूममध्ये जाताना आपण दररोज ही बटणं पाहतो, पण यामागचं कारण कधीच जाणून घेतलं नसेल.

Updated: Feb 20, 2022, 12:10 PM IST
फ्लशमध्ये एक लहान आणि एक मोठं बटन, यामागचं कारण माहितीय  title=

मुंबई : Why toilet flush has one large and one small button: वॉशरूमला जाताना आपण कधी विचार करतो की फ्लशच्या बटणांमागची कल्पना. मॉल ते अगदी आता आपल्या घरांपर्यंत फ्लश (Flush) असतात. यामध्ये खूप बदल झालेला आहे. कायम या फ्लशमध्ये मोठं बटण आणि लहान बटण असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, या बटणांमागचं कारण काय? 

पाणी वाचवण्याच कारण 

मॉर्डन टॉयलेट्समध्ये दोन पद्धतीचे लीवर्स अथवा बटण असतात. दोन्ही बटण हे कायम एक्झिट वॉल्व (Exit Valve) शी संबंधीत आहे. मोठं बटण प्रेस केल्यावर ६ लीटर पाणी बाहेर येतं. तर लहान बटण दाबल्यावर ३ ते ४.५ लीटर पाणी बाहेर येतं. 

एका वर्षात मोठी बचत 

जर एका घरात Single Flush च्या ऐवजी Dual Flush चा वापर करत असतील. तर संपूर्ण वर्ष जवळपास २० लीटर पाणी वाचवू शकता. 

जरी याचं इंस्टॉलेशन हे नॉर्मल फ्लशपेक्षा महाग आहे. मात्र यामुळे तुमच्या पाण्याच्या बीलमध्ये कपात होते. 

कशी काम करते ही सिस्टम? 

Dual Flush च्या कॉन्सेप्टबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेतील इंडस्ट्रीयल डिझाइनर Victor Papanek यांच्या डोक्यातून ही कल्पना आली आहे. १९७६ साली Victor यांनी ‘Design For The Real World’ याचा उल्लेख केला आहे.