झाडी, डोंगर विसरा... टूरिझमसाठी आलाय नवा ट्रेंड, Dark Tourism...?

बदलत्या काळानुसार लोकांच्या पर्यटनाचा ट्रेंडही (Tourism trend) बदलताना दिसतोय.पर्यटकांना सध्या डार्क टुरिझम (Dark Tourism) आकर्षित करतंय. 

Updated: Nov 4, 2022, 08:14 PM IST
झाडी, डोंगर विसरा... टूरिझमसाठी आलाय नवा ट्रेंड, Dark Tourism...? title=

Dark Tourism : फिरायला जायला कोणाला आवडत नाही. सुट्ट्या टाकून पर्यटनासाठी (Tourism) जायचा अनेकांना बेतही आखला असेल. बदलत्या काळानुसार लोकांच्या पर्यटनाचा ट्रेंडही (Tourism trend) बदलताना दिसतोय. जगभरात पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी विविध मार्गांनी पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. काही वर्षांपूर्वी कृषी पर्यटनाने पर्यटकांना भुरळ घातली होती. पण अशातच आता एक नवा ट्रेंड रुजतो. पण हा ट्रेंड साधासुधा नसून थोडा हटके आहे. तो म्हणजे पर्यटकांना सध्या डार्क टुरिझम (Dark Tourism) आकर्षित करतंय. 

Dark Tourism हा शब्द ऐकल्यावच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नेमकं आहे तरी काय? जगातील अशी ठिकाणं कुठे कुठे आहेत जिथे तुम्हीही डार्क टुरिझमसाठी जाऊ शकतं. चला जाणून घेऊ सविस्तर.

डार्क साईट्स कोणत्या ?

सध्या पर्यटक अशा ठिकाणी भेट देणं पसंत करतायत जिथे एखादं हत्याकांड किंवा मोठी घटना घडली असेल. तणाव, दुःख, वेदना किंवा एखादी मोठी दुर्घटना घडून गेलेल्या ठिकाणी पर्यटन करणं म्हणजे डार्क टुरिझम. जगभरातील अशी अनेक ठिकाणं जिथे बऱ्याच वर्षांपासून भयाण शांतत आहे. ज्या ठिकाणी एकेकाळी वस्ती होती, पण आता तिथेच स्मशान शांतता पसरलीये. या ठिकाणांना डार्क स्पॉट्स किंवा डार्क साइट्स म्हटलं जातं 

डार्क टुरिझम म्हणजे ?

नैसर्गिक आपत्ती, अपघात तसंच मानवनिर्मित आपत्तीनंतर देशाची किंवा शहराची परिस्थिती कशी आहे, या भयानक परिस्थितींना तोंड देण्यासाठी काय करता येईल? हे जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची लोकांची आवड वाढलीये. नुकतंच या लिस्टमध्ये युक्रेन या देशाच्या नावाचा समावेश झाला आहे.

यासंदर्भात एका वेबसाईटने सर्वेक्षण केलंय. या सर्वेक्षणात नमूद केल्याप्रमाणे, "अमेरिकेच्या 80 टक्के लोकसंख्येला आयुष्यात एकदा डार्क टुरिझम करायचं आहे. तर 30 टक्के अमेरिकन लोकांना युक्रेनला जायचंय. लोकं युद्ध थांबण्याची वाट पाहत आहेत." 

या सर्व्हेक्षणावरून असं समोर येतंय की, भयावह दृश्य किंवा अशा ठिकाणांना भेट देण्याबद्दल किंवा त्याची माहिती जाणून घेण्यात लोकांना खूप रस आहे. अशा जागांना भेट देऊन त्यातून धडा घ्यायचा असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

डार्क टुरिझम साईट्स

बोस्टन, जपानचे आत्मघाती जंगल आओकिगाहारा, कोलंबियाचं आलिशान तुरुंग पाब्लो झोबार, पोलंडमधील टॉर्चर चेंबर, टेनेसीचे मॅककीमी मनोर घोस्ट.

तर आता तुम्ही वाट कसली बघतायत तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर लवकर प्लॅन करा आणि करा डार्क टुरिझम...