Loan Against Property: आयुष्यात कोणती घटना किंवा संकट येईल सांगता येत नाही. आर्थिक अडचण आल्यास कर्ज घेण्याची वेळ येते. अशावेळी कर्जाबाबत माहिती असणं आवश्यक आहे. सुरक्षित आणि असुरक्षित असे कर्जाचे दोन प्रकार आहेत. प्रॉपर्टीच्या बदल्यात घेतलेलं कर्ज सुरक्षित कर्ज म्हणून ओळखलं जातं. यामुळे कर्ज देणाऱ्या बँका किंवा फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडरला कर्ज देणं सोपं होतं. पैशांसाठी प्रॉपर्टी गहाण ठेवली जाते. प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्जाचा फायदा नोकरदार आणि धंदेवाईक दोन्ही घेऊ शकतात. Loan Against Property सुरक्षित कर्ज असल्याने याचा ईएमआय देखील कमी असतो. होम लोनच्या तुलनेत कमी व्याज असतं. प्रॉपर्टी गहाण ठेवून घेतलेलं कर्ज उद्योग-धंदा, शिक्षण, लग्न, वैद्यकीय खर्च आणि इतर कामासाठी वापरलं जाऊ शकतं.
घर खरेदी- दुसरं घर खरेदी करण्यासाठी या स्किमचा फायदा घेऊ शकतो. प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज घेणं सोपं पडतं. त्याचबरोबर कर्जावर कमी व्याज द्यावं लागतं. याशिवाय, कर्ज देणाऱ्या संस्थेकडे सध्याची मालमत्ता गहाण ठेवल्यास कर्जदार त्याचा वापर करू शकतो.
कर्जाची परतपेड करण्याचा अवधी- मालमत्ता गहाण ठेवून घेतलेलं कर्ज स्वस्त तर असतं. त्याचबरोबर भरण्याचा कालावधी देखील अधिक असतो. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी 15 ते 20 वर्षापर्यंत फ्लेक्सिबल आणि लाँग रिपेमेंट टेन्योरसह येतं. कर्जाची परतपेड करण्याचा अवधी जास्त असल्यास मासिक हप्तादेखील कमी असतो. त्यामुळे कर्ज घेणाऱ्याच्या डोक्यावर भार नसतो.
बातमी वाचा- Term Insurance विकत घेताना आणि कवर निश्चित करताना 'या' बाबी लक्षात ठेवा, जाणून घ्या
व्यवसायासाठी आवश्यक रक्कम- मालमत्ता गहाण ठेवून घेतलेलं कर्ज व्यवसायिकांना फायदेशीर ठरतं. फ्लेक्जिबिलिटी आणि परतफेडीचा दीर्घ कालावधी यामुळे फायदा होतो. या कर्जाची रक्कम मालक त्यांच्या व्यवसायासाठी कर्मचारी नियुक्त करू शकतात. या पैशातून व्यवसाय यंत्रसामग्रीही विकत घेता येते.
मोठ्या खर्चाचं व्यवस्थापन- कर्जदार इतर कारणांसाठी या कर्जाचा वापर करू शकतात. मालमत्तेवरील कर्ज मोठ्या खर्चासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी, परदेशी सहलीसाठी, लग्नासाठी, वैद्यकीय आणीबाणीसाठी किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरले जाऊ शकते.